Video: 'चहापेक्षा किटली गरम!' बॉडीगार्डने जोरात ढकलल्याने चाहता कोसळला, नागार्जुनचा माफीनामा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 10:12 AM2024-06-24T10:12:34+5:302024-06-24T10:14:11+5:30

नागार्जुन एअरपोर्टवर येताच त्याच्या बॉडीगार्डने चाहत्याला जोरात ढकलल्याने तो पडला. नागार्जुनच्या हे लक्षात आल्यावर त्याने आता जाहीर माफी मागितलीय.

actor Nagarjuna apologise After Being Slammed For Ignoring Bodyguard Pushing Away Specially Abled Fan At Mumbai | Video: 'चहापेक्षा किटली गरम!' बॉडीगार्डने जोरात ढकलल्याने चाहता कोसळला, नागार्जुनचा माफीनामा!

Video: 'चहापेक्षा किटली गरम!' बॉडीगार्डने जोरात ढकलल्याने चाहता कोसळला, नागार्जुनचा माफीनामा!

आपल्या लाडक्या कलाकाराची एक झलक पाहण्यासाठी चाहते अक्षरशः जीवाचं रान करत असतात. आधी कलाकारांच्या ऑटोग्राफसाठी गर्दी व्हायची अन् आता सेल्फीसाठी. मोबाईलमध्ये आवडत्या कलाकारासोबत एक छबी टिपण्यासाठी चाहते उत्सुत असतात. पण कधीकधी त्यांना वाईट अनुभवालाही सामोरं जावं लागतं. इतकंच नव्हे तर कलाकार राहिले दूर, त्यांचे बॉडीगार्ड चाहत्यांना हुसकावून लावतात. असाच एक अनुभव नुकताच नागार्जुनच्या चाहत्याला आलाय. पण पुढे नागार्जुनने दखल घेत सोशल मीडियावर चाहत्याची माफीही मागितलीय. 

नागार्जुनच्या चाहत्याला बॉडीगार्डने जोरात ढकललं

मुंबई एअरपोर्टवर काल नागार्जुन आणि धनुष स्पॉट झाले. दोघेही शांतपणे एअरपोर्टच्या बाहेर पडत होते. अशातच नागार्जुनचा एक दिव्यांग चाहता त्याला भेटण्यासाठी समोर आला. त्याने अभिनेत्याच्या हाताला स्पर्श केला. अभिनेत्याच्या बॉडीगार्डला ही गोष्ट लक्षात येताच त्याने चाहत्याला दूर ढकलले. या कृतीमुळे चाहत्याचा तोल गेला आणि तो मागे पडता पडता वाचला. नागार्जुनला मात्र या कोणत्याच गोष्टीची कल्पना नव्हती. धनुषला मात्र ही गोष्ट लक्षात आल्याने त्याने मागे वळून पाहिलं. त्यामुळे नागार्जुनवर लोकांनी टीका केली. अखेर ही गोष्ट लक्षात येताच नागार्जुनने जाहीर माफी मागितली आहे. 

नागार्जुनने मागितली माफी 

हा व्हिडीओ व्हायरल होताच नागार्जुनने ट्विटरवर या गोष्टीसंबंधी जाहीर माफी मागितली. नागार्जुन म्हणाला,  "हे नुकतेच माझ्या निदर्शनास आले… हे घडायला नको होते!! मी त्या गृहस्थाची माफी मागतो. याशिवाय भविष्यात असे होणार नाही याची आवश्यक ती खबरदारी घेईन !!" अशाप्रकारे नागार्जुनने माफी मागितली. दरम्यान काल सोनाक्षी सिन्हाच्या लग्नासाठी नागार्जुन आणि धनुष मुंबईत दाखल झाल्याची चर्चा आहे.

Web Title: actor Nagarjuna apologise After Being Slammed For Ignoring Bodyguard Pushing Away Specially Abled Fan At Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.