ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना पुत्रशोक...
By Admin | Updated: September 28, 2015 20:32 IST2015-09-28T20:32:03+5:302015-09-28T20:32:03+5:30
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा मोठा मुलगा हेमंत भोसले याचं कर्करोगाच्या उपचारादरम्यान स्कॉटलंडमध्ये निधन झालं आहे. मागील काही दिवसापासून त्यांच्यावर खाजगी रुग्नालयात उपचार सुरू होते

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना पुत्रशोक...
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा मोठा मुलगा हेमंत भोसले याचं कर्करोगाच्या उपचारादरम्यान स्कॉटलंडमध्ये निधन झालं आहे. मागील काही दिवसापासून त्यांच्यावर खाजगी रुग्नालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान ही दु:खद घटना घडली आहे.
गेल्या वर्षभरापासून हेमंत भोसले कर्करोगाशी झुंजत होते. सहा- सात वर्षांपासून स्कॉटलंडमध्ये वास्तव्यास असलेल्या हेमंत यांच्यावर तिथेच उपचार सुरु होते. हेमंत भोसले हे पेशाने संगीतकार होते. त्यांनी १९७० - ८५ च्या दरम्यान हेमंत भोसले यांनी आखरी संघर्ष, अनपढ, दामाद, धरती आकाश, नजराना प्यार का, राजा जोगी यासारख्या बॉलिवूड चित्रपटास संगीत दिले होते. हिंदी प्रमाणे त्यांनी मराठी चित्रपटामध्ये आपली छाप सोडली आहे.
शारद सुंदर चंदेरी राती, जा जा जा रे नको बोलू, मी अशी मोठी कशी गं, बाळा माझ्या नीज यासारखी हेमंत भोसले यांनी संगीतबद्ध केलेली मराठी गाणी विशेष गाजली होती.
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जन्मदिवसाच्या पूर्वसंध्येला आलेल्या बातमीमुळे मंगेशकर कुटुंबासह संगीत क्षेत्रातही शोकाकुल वातावरण आहे.