क्रांतीने केले सोनमचे कौतुक
By Admin | Updated: February 27, 2016 03:44 IST2016-02-27T03:44:16+5:302016-02-27T03:44:16+5:30
दोन हीरोइन्स कधी एकत्र काम करू शकत नाहीत, असे सर्रास बोलले जाते. जर एखाद्या चित्रपटाच्या निमित्ताने दोन हीरोइन्स एकत्र आल्या तर त्यांच्यातील शीतयुद्ध आणि

क्रांतीने केले सोनमचे कौतुक
दोन हीरोइन्स कधी एकत्र काम करू शकत नाहीत, असे सर्रास बोलले जाते. जर एखाद्या चित्रपटाच्या निमित्ताने दोन हीरोइन्स एकत्र आल्या तर त्यांच्यातील शीतयुद्ध आणि कॅटफाइटविषयीच जास्त गॉसिपिंग केले जाते. मग अशा वेळी एखाद्या हीरोइनने दुसऱ्या हीरोइनच्या कामाची प्रशंसा करणे म्हणजे खरेच फार मोठी गोष्ट असेच वाटते. आणि तेदेखील एका मराठमोळ्या अभिनेत्रीने थेट बॉलीवूड अभिनेत्रीचे तिच्या कामासाठी कौतुक केले तर फार काही आश्चर्य वाटायला नकोच. क्रांती रेडकरने सोनम कपूरच्या नीरजा चित्रपटातील अभिनयासाठी तिचे भरभरून कौतुक केले आहे. तू नीरजा भानोतचा रोल एक्सलंट केला आहेस. तू अक्षरश: नीरजाला जागलीस अन् फ्लॉवलेस परफॉर्मन्स दिलास, अशा शब्दांमध्ये क्रांतीने सोनमच्या नीरजामधील अभिनयाला अॅप्रिशिएट केले आहे.