-अन् सोनम कपूरचे पित्त खवळले! मीडियाला लिहिले ओपन लेटर!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 16:22 IST2017-10-17T10:52:56+5:302017-10-17T16:22:56+5:30
‘वीरे दी वेडिंग’च्या सेटवरची एक बातमी बातमी आली आणि या बातमीने सोनम कपूरचे पित्त खवळले.
.jpg)
-अन् सोनम कपूरचे पित्त खवळले! मीडियाला लिहिले ओपन लेटर!!
‘ ीरे दी वेडिंग’च्या सेटवरच्या एका बातमीमुळे तुमची आमची लाडकी सोनम कपूर म्हणे नाराज झालीय. होय, या चित्रपटात तिच्यासोबत करिना कपूर खान, स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानिया आहेत, हे तुम्हाला ठाऊक आहेच. मध्यंतरी ‘वीरे दी वेडिंग’च्या सेटवरची एक बातमी आली होती. ‘वीरे दी वेडिंग’च्या सेटवर कॅट फाईट सुरु असल्याची बातमी एका मनोरंजन पोर्टलने दिली होती. ही कॅट फाईट कुणात तर सोनम कपूर आणि करिना कपूर खान या दोघींमध्ये. खरे तर अशा कॅट फाईटच्या बातम्या नेहमीच येत असतात. (बॉलिवूडमध्ये कुठल्याच अभिनेत्रींमध्ये मैत्री होऊ शकत नाही, असेही मानले जाते.) पण ‘वीरे दी वेडिंग’च्या सेटवरच्या कॅट फाईटची बातमी आली आणि या बातमीने सोनम कपूरचे पित्त खवळले. ही बातमी धादांत खोटी आणि बेजबाबदारपणा असल्याचे सोनमने म्हटले. केवळ इतकेच नाही तर अशा बातम्या महिलांना त्रास देण्यासाठी मुद्दाम पेरल्या जातात, असा आरोपही तिने केला. सोनमने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून या बातमीबद्दल उघड उघड नाराजी व्यक्त केली आहे.
‘प्रिय वेबसाईट, तुम्ही भलेही आपल्या ब्लार्इंड आयटम्समध्ये महिला एकमेकांसोबत भांडत असल्याची बातमी छापून काही प्रसिद्धी मिळवाल. पण यात जराही सत्य नाही. काही महिला एकत्र येऊन काम करतात. याचा अर्थ त्या ठिकाणी कॅट फाईट होणारच, हे गरजेचे नाही. आम्ही कायम चांगल्या मैत्रिणी बनून राहू, शानदार चित्रपट एकत्र करू. महिला एकमेकांसोबत काम करू शकतात, सोबत राहू शकतात आणि पडद्यावर धमाकाही करू शकतात, हे आम्ही सिद्ध करू. तुमचा दृष्टिकोण आता जुनाट झालाय. तो जुनाटचं नाही तर अतिशय बेजबाबदारपणाचा आणि हानीकारकही आहे. महिला संस्कृतीसाठी हे निराशाजनक चित्र आहे,’ असे सोनमने म्हटले आहे.
ALSO READ: ...आणि सोनम कपूरचे हे स्वप्न झाले पूर्ण !
खरे सांगायचे तर सोनम म्हणते त्यात निश्चितपणे दम आहे. पण शेवटी गॉसिप्स हा बॉलिवूडचा अविभाज्य भाग आहे. चित्रपटांप्रमाणेच चित्रपटसृष्टीशी निगडीत गॉसिप्स हा सुद्धा अनेकांच्या करवणुकीचा प्रकार आहे. हे समजून घेतले असते तर कदाचित सोनमला इतका त्रास झाला नसता.