तीन चित्रपटांमध्ये अडकली सोनाक्षी

By Admin | Updated: November 18, 2014 02:01 IST2014-11-18T02:01:18+5:302014-11-18T02:01:18+5:30

सोनाक्षी सिन्हा सध्या अवघड परिस्थितीत सापडली आहे. तिचे आगामी दोन चित्रपट डिसेंबर महिन्यात एकापाठोपाठ एक असे रिलीज होत आहेत,

Sonakshi stuck in three films | तीन चित्रपटांमध्ये अडकली सोनाक्षी

तीन चित्रपटांमध्ये अडकली सोनाक्षी

सोनाक्षी सिन्हा सध्या अवघड परिस्थितीत सापडली आहे. तिचे आगामी दोन चित्रपट डिसेंबर महिन्यात एकापाठोपाठ एक असे रिलीज होत आहेत, तर तिसरा चित्रपट जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात रिलीज होणार आहे. त्यामुळे सोनाक्षीच्या खांद्यावर या तिन्ही चित्रपटांच्या प्रमोशनची जबाबदारी एकाच वेळी आली आहे. ‘अ‍ॅक्शन जॅक्सन’ आणि ‘लिंगा’ डिसेंबर महिन्यात रिलीज होत असून ‘तेवर’ जानेवारीमध्ये रिलीज होत आहे. या तिन्ही चित्रपटांच्या प्रमोशनसाठीच्या डेटस् सोनाक्षीला मॅनेज करायच्या आहेत. मागील वर्षीही सोनाक्षीसमोर अशीच परिस्थिती उद्भवली होती. ‘बुलेट राजा’ आणि ‘आर. राजकुमार’ हे चित्रपट आठवडाभराच्या फरकाने रिलीज झाले होते. लवकरच रिलीज होणाऱ्या या तीन चित्रपटांच्या प्रमोशनसाठी सोनाक्षीला वेळेचे नियोजन करावे लागणार आहे. ‘लिंगा’ चित्रपटातून सोनाक्षी तामिळमध्ये एन्ट्री करीत आहे. त्यामुळे तिला मुंबई ते चेन्नई असा प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे सोनाक्षीची तारांबळ उडेल हे नक्की.

Web Title: Sonakshi stuck in three films

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.