सोनाक्षी सिन्हाने प्रेंग्नेसीच्या चर्चेवर सोडलं मौन, म्हणाली - "मी कोणतीही मस्करी केलेली नाही..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 14:01 IST2025-11-22T14:00:43+5:302025-11-22T14:01:20+5:30
बॉलिवूडची खामोश गर्ल म्हणजेच सोनाक्षी सिन्हाचे (Sonakshi Sinha) जहीर इक्बालसोबत (Zaheer Iqbal) लग्न झाल्यापासून तिच्या प्रेग्नन्सीच्या अफवा पसरल्या आहेत. आता सोनाक्षी सिन्हाने एका मुलाखतीत तिच्या प्रेग्नन्सीच्या अफवांवर स्पष्टपणे भाष्य केले आहे.

सोनाक्षी सिन्हाने प्रेंग्नेसीच्या चर्चेवर सोडलं मौन, म्हणाली - "मी कोणतीही मस्करी केलेली नाही..."
बॉलिवूडची खामोश गर्ल म्हणजेच सोनाक्षी सिन्हाचे (Sonakshi Sinha) जहीर इक्बालसोबत (Zaheer Iqbal) लग्न झाल्यापासून तिच्या प्रेग्नन्सीच्या अफवा पसरल्या आहेत. दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात सोनाक्षीने एका मजेशीर इन्स्टाग्राम पोस्टद्वारे या अफवा फेटाळून लावल्या होत्या. तिने त्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते, "मानवी इतिहासातील सर्वात लांब प्रेग्नन्सीचा वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर."
रमेश तौरानी यांच्या दिवाळी पार्टीत, तिचा पती जहीर इक्बालने सोनाक्षीच्या पोटावर हात ठेवून पॅपाराझींसाठी एक फोटो क्लिक केला होता. प्रेग्नन्सी कन्फर्म केल्याचा अभिनय करत त्याने या अफवांवर मजेशीर पद्धतीने निशाणा साधला होता. आता सोनाक्षी सिन्हाने एका मुलाखतीत तिच्या प्रेग्नन्सीच्या अफवांवर स्पष्टपणे भाष्य केले आहे.
प्रेग्नन्सीच्या अफवांवर सोनाक्षी सिन्हा काय म्हणाली?
न्यूज १८ शोशाला दिलेल्या मुलाखतीत सोनाक्षी सिन्हा म्हणाली, "मी कोणताही मस्करी केली नाही. मीडिया फक्त माझ्यावर मस्करी करत राहतो. त्यांना सतत वाटते की मी प्रेग्नेन्ट आहे! जेव्हा मी प्रेग्नन्ट होईन, तेव्हा मी सर्वात आधी जगाला सांगेन की मित्रांनो, आता मी प्रेग्नेन्ट आहे, गप्प बसा."
लग्नानंतर काहीही बदलले नाही
सोनाक्षी आणि जहीर यांनी सुमारे सात वर्षे डेटिंग केल्यानंतर जून २०२४ मध्ये लग्न केले. लग्नानंतर काहीही बदलले नाही याचा तिला आनंद आहे, विशेषत: तिच्या कामाच्या आणि करिअरच्या बाबतीत. बॉलिवूडमध्ये अनेकदा विवाहित अभिनेत्रींना बाजूला केले जाते, पण सोनाक्षी आनंदी आहे की ती अजूनही पूर्वीच्याच उत्साहाने आणि उर्जेने काम करत आहे. ती म्हणाली, "त्या (आमच्या आधीच्या पिढीतील महिला कलाकार) चालल्या, जेणेकरून आम्ही धावू शकू. आज, मला हे कल्पनाही करता येत नाही की माझे लग्न झाले आहे आणि त्यामुळे मला काम मिळणार नाही. हा विचारही माझ्या मनात येत नाही. मी त्या दिशेने बिल्कुल विचार करू शकत नाही. लग्न हा आयुष्याचा एक भाग आहे, असे म्हटले जाते."
लग्न कोणत्याही प्रोफेशनमध्ये अडथळा ठरत नाही
ती पुढे म्हणाली, "लग्न कोणत्याही दुसऱ्या प्रोफेशनमध्ये अडथळा आणत नाही. आज, जर एखादी महिला पत्रकार लग्न करत असेल, तर ती अचानक काम करणे बंद करणार नाही. त्यांच्या कामाच्या आयुष्यात कोणतीही अडचण येणार नाही. आमच्यासाठी मार्ग मोकळा करणाऱ्या त्या महिला कलाकारांना माझा सलाम." चित्रपट इंडस्ट्रीतून वयाचा भेददेखील नाहीसा झाला आहे का, असे विचारले असता, ती म्हणाली, "युवकांबद्दलची ही आसक्ती काही प्रमाणात अस्तित्वात आहे. पण मला वाटते की बहुतेक लोक आता त्यातून पुढे सरकले आहेत. ते याकडे दुर्लक्ष करण्यास तयार आहेत."
प्रत्येक वयोगटातील महिलांसाठी लिहिल्या जाताहेत भूमिका
आपले मत अधिक स्पष्ट करण्यासाठी, तिने जया बच्चन यांचं उदाहरण दिले, ज्यांनी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' मधून पुनरागमन केले आणि आता 'दिल का दरवाजा खोल ना डार्लिंग' मध्ये दिसणार आहेत. सोनाक्षी म्हणाली, "आज, प्रत्येक वयोगटातील महिलांसाठी भूमिका लिहिल्या जात आहेत, काही सुंदर देखील आहेत. आपण अशा युगात जगत आहोत जिथे १७ आणि १८ वर्षांच्या नवीन अभिनेत्री देखील पदार्पण करत आहेत. त्याचबरोबर, जया जी आणि शबाना आझमी जी देखील काम करत आहेत. मला वाटते की प्रत्येक महिला तिच्या मर्यादेत येऊन, तिचे स्थान निर्माण करत आहे आणि त्यात जीव भरत आहे, हे सांगणे खूप चांगले आहे."