सोनमवर जळते सोनाक्षी
By Admin | Updated: December 21, 2014 23:56 IST2014-12-21T23:56:44+5:302014-12-21T23:56:44+5:30
सलमान खानसोबत ‘दबंग’मधून धमाकेदार एंट्री करणाऱ्या सोनाक्षी सिन्हाचे आता सलमानशी फारसे सख्य राहिले नाही. सोनाक्षीची जागा आता सोनम कपूरने घेतली आहे.

सोनमवर जळते सोनाक्षी
सलमान खानसोबत ‘दबंग’मधून धमाकेदार एंट्री करणाऱ्या सोनाक्षी सिन्हाचे आता सलमानशी फारसे सख्य राहिले नाही. सोनाक्षीची जागा आता सोनम कपूरने घेतली आहे. त्यामुळेच की काय सोनम आणि सोनाक्षीमधून आता विस्तवही जात नसल्याची चर्चा आहे. सलनामचा भाऊ अरबाज खान निर्मित ‘डॉली की डोली’ या चित्रपटासाठी सोनमला बहुतांश कलावंतांनी सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या आहेत. अपवाद मात्र सोनाक्षीचा. सोनाक्षीने सोनमच्या या चित्रपटाची दखल घेतलेली नाही. सूरज बडजात्याच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या आगामी चित्रपटात सोनमही सलमानची हिरोईन असणार आहे. सोनम आणि सलमानच्या ‘केमिस्ट्री’ची सोशल मीडियावर धूम आहे.