स्टार सन्स काही हिट काही फ्लॉप

By Admin | Updated: July 27, 2015 02:05 IST2015-07-27T02:05:39+5:302015-07-27T02:05:39+5:30

‘पापा कहते है, बडा नाम करेगा...’ म्हणत अनेक बॉलिवूड सुपरस्टारच्या मुलांनी फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केले. त्या सगळ्यांकडेच होती ती खानदानी

Some hits on Star Sons some flops | स्टार सन्स काही हिट काही फ्लॉप

स्टार सन्स काही हिट काही फ्लॉप

‘पापा कहते है, बडा नाम करेगा...’ म्हणत अनेक बॉलिवूड सुपरस्टारच्या मुलांनी फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केले. त्या सगळ्यांकडेच होती ती खानदानी ओळख. परंतु त्यातील काही गुणवत्तेच्या जोरावर हिट तर काही जण फ्लॉप ठरले. अशाच काही स्टार सन्सच्या यशापशाची ही कथा...

करिना रणधीर कपूर
बॉलिवूडची ही हॉट बेबो अनेक यशस्वी चित्रपटांची नायिका ठरली आहे. तिची बहीण करिश्मा कपूरपेक्षाही करिना हिट राहिली आहे. कपूर घराण्याचा वारसा पाठीशी असला तरी तिने आपली अभिनय क्षमताही वेळोवेळी सिद्ध केली आहे. तिचे वडील रणधीर कपूर फारसे यशस्वी होऊ शकले नाही. परंतु करिनाने बाई बबीतासारखेच यश मिळवले आहे.

आलिया महेश भट्ट
आलिया खूप कमी वयात चित्रपट सृष्टीत आली. परंतु आपल्या सहज-सुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. वडील प्रसिद्ध दिग्दर्शक असतानाही करण जोहरने तिला लॉन्च केले. बहीण पूजा भटपेक्षाही अर्थातच आलियाची चर्चा जास्त होत आहे.

श्रद्धा शक्ती कपूर
नकारात्मक व विनोदी भूमिकांद्वारे चंदेरी दुनियेत आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे शक्ती कपूर यांची गुणी कन्या श्रद्धा कपूरनेही आपल्या पहिल्याच चित्रपटाद्वारे दमदार आगमन केले. आशिकी-2 हा तिचा पहिला चित्रपट होता. परंतु एकच हिट देवून ती थांबली नाही तर हैदर, एबीसीडी-2 असे यशस्वी चित्रपटही तिच्या नावावर आहेत.

ईशा धर्मेंद्र देओल
धर्मेंद्र-हेमामालिनी या बॉलिवूडमधील अतिशय हिट कपल्सच्या पोटी जन्माला आलेल्या ईशा देओलला तिच्या पालकांसारखी यशाची चव काही चाखता आली नाही. धूम सारखे काही हिट सिनेमात तिने काम केले असले तरी त्या सिनेमाच्या यशाचे श्रेय ईशाला काही मिळाले नाही. अनेक प्रयत्न करूनही दमदार यश मिळत नसल्याने ती अखेर लग्न करून संसारात रमली.

फरदीन फिरोज खान
प्रसिद्ध अभिनेते फिरोज खान यांचा मुलगा फरदीन खान गुड लुकिंग असला तरी सिनेमात काही यशस्वी ठरू शकला नाही. भूत, जानशीन, हे बेबी हे त्याचे चित्रपट अगदी ओळीने कोसळले. अपवाद ठरला तो फक्त नो एंट्रीचा. परंतु हा चित्रपट मल्टीस्टारर असल्याने त्याचा फायदा फरदीनला झाला नाही.
उदय यश चोप्रा
यशराज फिल्म्सच्या माध्यमातून हिंदी सिनेमाला अनेक स्टार नायक-नायिका देणाऱ्या यश चोप्रा हे त्यांच्या चिरंजीवाला म्हणजे उदय चोप्राला मात्र स्टार बनवू शकले नाहीत. चांगल्या अभिनयाला उत्तम डान्सची जोड असतानाही उदय या क्षेत्रात आपले पाय घट्ट रोवू शकला नाही. नाही म्हणायला धूम चित्रपटाच्या प्रत्येक सिक्वलमध्ये उदय असला तरी भाव मात्र या चित्रपटाचे नायकच खाऊन गेले.

Web Title: Some hits on Star Sons some flops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.