...म्हणून सनी लिओनी झाली पॉर्नस्टार
By Admin | Updated: February 22, 2017 14:37 IST2017-02-22T13:25:33+5:302017-02-22T14:37:28+5:30
पॉर्नस्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणा-या सनी लिओनीचा एक मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या खासगी आयुष्यामध्ये अनेकांना रस आहे.

...म्हणून सनी लिओनी झाली पॉर्नस्टार
tyle="text-align: justify;"> ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - पॉर्नस्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणा-या सनी लिओनीचा एक मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या खासगी आयुष्यामध्ये अनेकांना रस आहे. वास्तविक स्वत:वर पॉर्नस्टारचा शिक्का मारुन घ्यायला कोणालाही आवडणार नाही. पण सनी पॉर्नस्टार का झाली ? यामागे एक कारण आहे. सनी कॅनडात एका पारंपारिक पंजाबी कुटुंबात लहानाची मोठी झाली.
तारुण्यात पदार्पण केल्यानंतर घरात कोणी नसताना तिने पहिल्यांदा पॉर्न फिल्म पाहिली. त्यानंतर आपण पकडले जाऊ या भितीपोटी तिने पुन्हा असे धाडस केले नाही. काहीवर्षांनी वयाच्या 19 व्या वर्षी तिने मित्र-मैत्रिणींसोबत पुन्हा पॉर्न फिल्म पाहिली. त्यावेळी फिल्ममधला न्यूडनेस तिला आवडला. त्यानंतर पैसे कमावण्यासाठी सनी एका बेकरीत आणि टॅक्स कंपनीत नोकरीला राहिली. पुढे तिचे कुटुंब अमेरिकेला स्थायिक झाल्यानंतर तिला मॉडलिंगचे काम मिळाले.
मॉडलिंगचे काम जोरात सुरु असताना तिला एजंटकडून पॉर्न फिल्ममध्ये काम करण्याचा प्रस्ताव आला. तिथे जास्त पैसे मिळणार असल्याने सनीने तो प्रस्ताव स्वीकारला. पॉर्न इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करताना सनीला जगाची पर्वा नव्हती पण तिला आई-वडिलांची चिंता सतावत होती. आई-वडिलांना माझा निर्णय सांगितल्यानंतर त्यांना धक्का बसला. पण त्यांनी माझी साथ सोडली नाही. पुढे त्यांनी माझा निर्णय मान्य केला असे तिने सांगितले.