म्हणून... सोनू निगमचा "पक्षपाती" ट्विटरला अलविदा
By Admin | Updated: May 24, 2017 12:46 IST2017-05-24T12:34:31+5:302017-05-24T12:46:49+5:30
गायक अभिजीत भट्टाचार्य यांचं ट्विटर अकाऊंट मंगळवारी ट्विटर इंडियाकडून सस्पेंड करण्यात आलं होतं. याप्रकरणी गायक सोनू निगम याच्याकडून अभिजीत भट्टाचार्य यांचं समर्थन केलं जातं आहे.

म्हणून... सोनू निगमचा "पक्षपाती" ट्विटरला अलविदा
> ![]()
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.24- गायक अभिजीत भट्टाचार्य यांचं ट्विटर अकाऊंट मंगळवारी ट्विटर इंडियाकडून सस्पेंड करण्यात आलं होतं. याप्रकरणी गायक सोनू निगम याच्याकडून अभिजीत भट्टाचार्य यांचं समर्थन केलं जातं आहे. सोनू निगमने त्याचं ट्विटर अकाऊंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी सकाळी ट्विट करून सोनू निगमने ही माहिती दिली आहे. अभिजीतच्या समर्थनासाठी सोनूने एकामागे एक असे एकूण चोवीस ट्विट्स केले आहेत. या ट्विटसमध्ये त्याने विविध मुद्दे मांडले आहेत. खरंतर अभिजीत भट्टाचार्य यांनी जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या नेत्या शेहला रशिद आणि लेखिका अरूंधती रॉय यांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. त्या कारणामुळे गायक अभिजीत यांचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे.
सोनूने बुधवारी सकाळी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, "खरोखरचं ट्विटरने अभिजीत भट्टाचार्यचं अकाऊंट सस्पेंड केलं आहे? का? असं जर असेल तर एखाद्याला धमकावणं, शिव्या देणं किंवा कट्टरतावादासाठी 90 टक्के ट्विटर अकाऊंट बंद व्हायला हवी.
या ट्विटनंतर अभिजीत यांचं समर्थन करण्यासाठी सोनू निगमने एकामागे एक अनेक ट्विट केले. शेहला यांच्याबद्दल केलंलं ट्विट त्यांच्या समर्थकांना भडकण्यासाठी पुरं पडलं नव्हतं का? असा प्रश्न सोनूने ट्विटमधून विचारला आहे. यानंतर केलेल्या ट्विटमध्ये सोनू म्हणतो, "जर अभिजीत भट्टाचार्य यांचं ट्विटर बंद करू शकता तर शेहला यांचं ट्विटर का बंद करू नये? किंवा जी लोकं रोज आई-बहिणीवरून अपशब्द वापरतात, अशांचं ट्विटर अकाऊंट का बंद केलं जातं नाही?
अभिजीत भट्टाचार्य यांच्या समर्थनार्थ ट्विट करत असताना सोनूने परेश रावल यांचीही बाजू घेतली आहे, "एक महिला गौतम गंभीरचा फोटो आर्मी जीपच्या समोर लावून दाखवू शकते आणि असंच काही परेश रावल यांनी केलं तर त्यांना टीकेचा धनी व्हावं लागलं होतं."
बुधवारी सकाळपासून सोनूने केलेल्या ट्विटच्या सीरीजमध्ये आपली बाजू पूर्णपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या समानता कुठे आहे? सगळ्या गोष्टी फक्त एका बाजूच्या का असतात ? ट्विटरवर इतकी नाराजी का आहे ? कुठलाही मुद्द्यावर समजदारीने चर्चा का होतं नाही ? असे प्रश्न सोनू निगमने ट्विटरच्या माध्यमातून विचारले आहेत.
या ट्विटमध्ये सोनूने ट्विटर अकाऊंट बंद करत असल्याचंही सांगितलं. "मी आज ट्विटर करत असलेल्या पक्षपातीपणामुळे ट्विटर अकाउंट बंद करत आहे. प्रत्येक वैचारिक, समजूतदार, देशभक्त आणि मानवतावादी असं करणार". मी कुठल्याही उजव्या किंवा डाव्या बाजू असलेला व्यक्ती नाही". मी इथे प्रत्येक विचारांचा मान राखतो. पण मला असं वाटतं तुम्ही सगळे भलताच विचार करत आहात, अशा आशयाचे ट्विट सोनूने केलं आहे.
वादग्रस्त वागणूक आणि विधानांमुळे सतत चर्चेत राहणारे गायक अभिजीत भट्टाचार्य यांचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहं. जेएनयूच्या छात्रसंघातील महिला नेता तसंच इतर महिलांबद्दल सातत्याने आक्षेपार्ह ट्विट केल्यामुळे अभिजीत यांच्याविरोधात हे पाऊल उचलण्यात आलं आहे.