म्हणून गोलमाल अगेनच्या प्रमोशनमधून गायब आहे रोहित शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 14:37 IST2017-10-17T09:07:56+5:302017-10-17T14:37:56+5:30

या दिवाळीत पुन्हा एकदा अजय देवगण आपल्या फॅन्सच्या भेटीस येणार आहे, हो येत्या दिवाळीत गोलमाल सिरीजचा अजून एक पार्ट ...

So, Golmaal is missing from the promotion of Ajay Rohit Shetty | म्हणून गोलमाल अगेनच्या प्रमोशनमधून गायब आहे रोहित शेट्टी

म्हणून गोलमाल अगेनच्या प्रमोशनमधून गायब आहे रोहित शेट्टी

दिवाळीत पुन्हा एकदा अजय देवगण आपल्या फॅन्सच्या भेटीस येणार आहे, हो येत्या दिवाळीत गोलमाल सिरीजचा अजून एक पार्ट गोलमाल अगेन रिलीज होत आहे.  या चित्रपटातील सर्व कलाकार मंडळी जोमाने चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. याच प्रमोशनच्या निमित्ताने गोलमालची टीम दिल्ली मध्ये गेली होती त्यावेळेस गोलमालच्या टीम ने मीडिया बरोबर चित्रपटाच्या संदर्भातील त्यांचे अनुभव शेअर केले.

आश्चर्याची गोष्ट अशी की या वेळेस गोलमालच्या टीम मध्ये एक व्यक्ती गैरहजर आहे तो म्हणजे गोलमालचा दिग्दर्शक रोहित शेट्टी. रोहित नेहमी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी उपस्थित असतो मात्र ह्या वेळेस दिल्लीमध्ये तो आला नाही. तर ह्याचे कारण असे की रोहित ह्याच चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनमध्ये व्यस्त होता म्हणून तो दिल्लीला जाऊ शकला नाही.

गोलमाल अगेनमध्ये अजय देवगण, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, अर्शद वारसी, कुणाल खेमु, तब्बू आणि परिणीती चोप्रा यांच्या मुख्य भूमिकेत आहेत.  हा चित्रपट तीन दिवसांनी म्हणजेच २० ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. गोलमालच्या सगळ्या सीरिज विनोदी होत्या त्यांनी प्रेक्षकांना भरपूर हसवले. ह्यावेळेस सुद्धा हा सिलसिला चालूच राहणार आहे. यावेळेस गोलमाल अगेनमध्ये डबल डोस आहे म्हणजेच ह्यात कॉमेडी तर आहेच पण त्याच बरोबर एक हॉररटच सुद्धा पाहायला मिळेल. गोलमाल अगेन चित्रपटगृहात धमाल करणार ह्यात तर शंकाच नाही.  

ट्रेलर लाँच दरम्यान तब्बू सांगितले की तिने या चित्रपटाची स्क्रिप्ट वाचल्याशिवाय तिने होकार दिला होता. ती पुढे म्हणाली कि मी गोलामाल सीरिजचा भाग बनण्यासाठी उत्सुक होते. त्यामुळे जेव्हा ही संधी तिला मिळाली तेव्हा तिने लगेच होकार दिला. यात भागात करिना कपूर खानला  रिप्लेस करत यात तिच्या जागा परिणीती चोप्राने घेतली आहे. परिणीता न्यूयॉर्कमध्ये असताना रोहित शेट्टीने कॉल करुन चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली होती. परिणीती सांगते काही काळ मला या गोष्टीवर विश्वासच बसला नव्हता. 

ALSO READ :  ​रोहित शेट्टीच्या गोलमाल सीरिजमध्ये का बदलतात दरवेळेस अभिनेत्री!?

Web Title: So, Golmaal is missing from the promotion of Ajay Rohit Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.