आकाश ठोसर झाला संस्कृतीचा फॅन

By Admin | Published: July 15, 2016 12:51 AM2016-07-15T00:51:52+5:302016-07-15T00:51:52+5:30

‘सैराट’मधील झिंगाट परश्याने संपूर्ण देशालाच वेड लावले आहे, ही काही आपल्यासाठी नवीन गोष्ट नाही, पण लाखो तरुणींची ‘दिल की धडकन’ असलेला आकाश ठोसर कोणाचा फॅन आहे

The sky is a fan of culture | आकाश ठोसर झाला संस्कृतीचा फॅन

आकाश ठोसर झाला संस्कृतीचा फॅन

googlenewsNext

‘सैराट’मधील झिंगाट परश्याने संपूर्ण देशालाच वेड लावले आहे, ही काही आपल्यासाठी नवीन गोष्ट नाही, पण लाखो तरुणींची ‘दिल की धडकन’ असलेला आकाश ठोसर कोणाचा फॅन आहे, हे तुम्हाला माहितीय का? तर ऐका, आकाश चाहता आहे एका अशा मराठमोळ्या अभिनेत्रीचा जिच्या नृत्याचे दिवाणे तर अनेक जण आहेत. तो तिच्या अ‍ॅक्टिंगपेक्षा डान्सचा दिवाणा आहे अन् तिच्या लटक्या-झटक्यांवर हा सैराट बॉय फिदा झाला आहे, तर ती अभिनेत्री आहे संस्कृती बालगुडे. अनेक चित्रपटांमधून विविधांगी भूमिका साकारलेली संस्कृती आता आपल्याला महेश मांजरेकर यांच्या एफयू या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत हा झिंगाट पोरगा आकाश दिसणार आहे, हे तर आपल्याला माहितीय. या दोघांनीही नुकताच झिंगाट या गाण्यावर डबस्मॅशदेखील केला होता. याबद्दल सीएनएक्सला दिलेल्या खास मुलाखतीत संस्कृतीने सांगितले की, ‘महेश मांजरेकर यांच्यासोबत मला काम करायचेच होते. एफयू चित्रपटात कॉलेजगोइंग मुलीचा रोल मला करायला मिळतोय. ही टिपिकल कॉलेज तरुणीचा भूमिका नसून त्यामध्ये तुम्हाला मी हटके अंदाजात पाहायला मिळेन. आकाश ठोसर, सत्या मांजरेकर, वैदेही परशुरामी यासारख्या माझ्याच वयाच्या कलाकारांसोबत मला या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच काम करण्याची संधी मिळत असल्याने मी हॅपी आहे. अन् आकाशबद्दल सांगायचे, तर सैराटच्या प्रचंड यशानंतरदेखील तो जमिनीवरच आहे. त्याच्यामध्ये बिलकूलच अ‍ॅटिट्यूड दिसत नाही. मी जेव्हा त्याला पहिल्यांदा भेटले, तेव्हाच त्याला सांगितले की, मी तुझी फॅन आहे, पण तो मला म्हणाला, ‘नाही खरं तर मीच तुझा फॅन आहे. तू खूप छान डान्स करतेस.’ हे ऐकून मला खूपच छान वाटले.’ आता या नव्या फ्रेश जोडीची केमिस्ट्री आपल्याला लवकरच एफयूमध्ये पाहायला मिळेल.

Web Title: The sky is a fan of culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.