सिंगल आहात, खुशाल वन नाईट स्टँडची मजा लुटा - सनी लिऑन

By Admin | Updated: May 6, 2016 17:56 IST2016-05-06T17:56:43+5:302016-05-06T17:56:43+5:30

बॉलिवूडची हॉट बेब सनी लिऑन या आठवडयात 'वन नाईट स्टँड' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अभिनेत्री रती अग्निहोत्रीचा मुलगा तनुज विरवानी तिच्यासोबत मुख्य भूमिकेत आहे.

Singles, enjoy the funniest One Night Stand - Sunny Leone | सिंगल आहात, खुशाल वन नाईट स्टँडची मजा लुटा - सनी लिऑन

सिंगल आहात, खुशाल वन नाईट स्टँडची मजा लुटा - सनी लिऑन

tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. ६ - बॉलिवूडची हॉट बेब सनी लिऑन या आठवडयात 'वन नाईट स्टँड' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अभिनेत्री रती अग्निहोत्रीचा मुलगा तनुज विरवानी तिच्यासोबत मुख्य भूमिकेत आहे. तनुज आणि सनी एकारात्री शरीरसुखाच्या ओढीने एकत्र येतात. त्यानंतर दोघेही पुन्हा मर्यादा ओलांडायची नाही असे ठरवतात. 
 
पण तसे घडते का ?, काय नाटयमय वळण येतात ते या चित्रपटात दाखवले आहे. वन नाईट स्टँड चित्रपटाच्या संकल्पनेबद्दल  काय वाटते असे सनीला विचारले असता तिने सांगितले की, प्रत्येकाचा बघण्याचा दुष्टीकोन आहे. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर, वन नाईट स्टँड आवडणार नाही. मी खूप भावूक आहे. मी लोकांशी लवकर जोडली जाते. 
 
पण म्हणून मी वन नाईट स्टँडच्या विरोधातही नाही. तुम्ही मॅनेज करू शकत असाल, एकवेळ शरीरसुख अनुभवायला तुम्ही तयार असाल तर का नाही ? असे सनीने सांगितले. वन नाईट स्टँडसाठी त्याला किंवा तिला तुम्ही फसवणार असाल तर त्याला माझे अजिबात समर्थन नाही. 
 
तुम्ही सिंगल आहात, कोणाबरोबर वन नाईट स्टँडची इच्छा असेल तर तुम्ही खुशाल पाऊल उचला. पण तुम्ही प्रेमात आहात तर, तुमच्यावर जीव लावणा-या व्यक्तीच्या भावनांचा विचार करा असे सनीने सांगितले. 
 

Web Title: Singles, enjoy the funniest One Night Stand - Sunny Leone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.