गायक, संगीतकार राम फाटक जयंती

By Admin | Updated: October 21, 2016 10:27 IST2016-10-21T10:27:30+5:302016-10-21T10:27:30+5:30

प्रसिद्ध मराठी गायक, संगीतकार रामचंद्र कृष्णाजी फाटक ऊर्फ राम फाटक यांची आज (२१ ऑक्टोबर) जयंती.

Singer, composer Ram Watak Jayanti | गायक, संगीतकार राम फाटक जयंती

गायक, संगीतकार राम फाटक जयंती

>- प्रफुल्ल गायकवाड
मुंबई, दि. २१ -  प्रसिद्ध मराठी गायक, संगीतकार रामचंद्र कृष्णाजी फाटक ऊर्फ राम फाटक यांची आज (२१ ऑक्टोबर) जयंती. 
 
शिक्षणाने एम.ए., बी.टी. असलेल्या राम फाटकांनी काही वर्षे शिक्षकी पेशा पत्करला. पुढे इ.स. १९५६ पासुन पुढील १० वर्षे नागपूर आकाशवाणी केंद्रावर तर त्यापुढील १० वर्षे पुणेआकाशवाणीवर त्यांनी नोकरी केली. इथेच भास्करराव गोडबोले आणि जे. एल. रानडे ह्यांसारख्यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. पुणे आकाशवाणी केंद्रावर असतानाच ज्येष्ठ गायक आणि संगीतकार सुधीर फडके ह्यांच्याशी त्यांचा स्नेह जुळला. सुधीर फडक्यांच्या गीतरामायणामधील काही गाणी ते गायले. आकाशवाणीच्या पुणे केंद्रासाठी त्यांनी शास्त्रीय संगीत गायिका बेगम परवीन सुलताना यांच्याकडून काही मराठी भावगीते गाऊन घेतली.
 
इ.स. १९७२ साली त्यावेळचे नवोदित गीतकार सुधीर मोघे ह्यांच्या 'सखी मंद झाल्या तारका' ह्या गीताला रामभाऊंनी स्वरबद्ध करून भीमसेन जोशी ह्यांच्याकडून हे गाणे गाऊन घेतले. पुढे हे गाणे ध्वनीफितीद्वारे सुधीर फडक्यांच्या स्वरात प्रकाशित करण्यात आले.
 
रामभाऊंनी ’संतवाणी’ मधील 'तीर्थ विठ्ठल', 'माझे माहेर पंढरी', 'पंढरी निवासा', 'अणुरेणीया थोकडा' हे पंडित भीमसेन जोशींकडून गाऊन घेतलेले अभंग खूपच लोकप्रिय झाले. ह्याबरोबरच 'दिसलीस तू', 'डाव भांडून मांडून मोडू नको' आणि 'सखी, मंद झाल्या तारका' ही सुधीर फडक्यांनी गायलेली भावगीते प्रचंड गाजली.
 
२६ सप्टेंबर २००२ साली त्यांचे निधन झाले.
 
सौजन्य : मराठी विकिपीडिया
 

Web Title: Singer, composer Ram Watak Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.