सिद्धार्थ कोणाला म्हणतोय मोदक?
By Admin | Updated: November 5, 2016 02:13 IST2016-11-05T02:13:57+5:302016-11-05T02:13:57+5:30
‘वजनदार’ या चित्रपटात आपल्याला मराठी चित्रपटसृष्टीतील एकदम वजनदार स्टारकास्ट पाहायला मिळत आहे.

सिद्धार्थ कोणाला म्हणतोय मोदक?
‘वजनदार’ या चित्रपटात आपल्याला मराठी चित्रपटसृष्टीतील एकदम वजनदार स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. सई ताम्हणकर, प्रिया बापट, सिद्धार्थ चांदेकर आणि चिराग पाटील यांच्या दमदार भूमिका आगामी ‘वजनदार’ या चित्रपटात असणार आहेत. प्रियाने या चित्रपटासाठी जेव्हा वजन वाढवले होते तेव्हा ती एकदमच गोलू पोलू दिसत होती. काही दिवसांपूर्वी प्रियाने तिचा वजन वाढलेला आणि वजन कमी केलेला असा दोन्ही फोटो सोशल मीडियावर अपलोड केला होता. या फोटोवर सिद्धार्थने प्रियाला अशी काही उपमा दिली, की प्रियाला हसू अनावर झाले. त्याला प्रिया उकडीच्या मोदकासारखी वाटली.
प्रियाचा आकार उकडीच्या मोदकासारखा झाला होता, असे सिद्धार्थने प्रियाला सांगितल्यावर ती खळखळून हसली. या चित्रपटातही सिद्धार्थला गोलू पोलू मुली आवडत असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्याच्या भूमिकेविषयी बोलताना सिद्धार्थ म्हणाला, की मला झीरो साइज मुलींपेक्षा थोड्या चबी चबी असणाऱ्या मुलीच आवडत असतात. पूजा ही अशीच माझ्या आयुष्यात आलेली एकदम क्युट मुलगी असते. मी तिच्यावर अगदी जिवापाड प्रेम करीत असतो. यानंतर पुढे काय घडते, हे बघायला तुम्हाला चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहावी लागणार असल्याचे सिद्धार्थ म्हणाला.