श्रेयसची फिरकी

By Admin | Updated: January 21, 2015 23:34 IST2015-01-21T23:34:04+5:302015-01-21T23:34:04+5:30

श्रेयस तळपदे म्हणजे सिनेसृष्टीतील अभिनयगुणसंपन्न, टॅलेंटेड कलाकार तेवढाच तो स्वभावाने मस्तीखोर. आपल्या सहकलाकारांच्या, क्रू सदस्यांच्या खोड्या काढण्यात एकदम पटाईत.

Shreyas spin | श्रेयसची फिरकी

श्रेयसची फिरकी

श्रेयस तळपदे म्हणजे सिनेसृष्टीतील अभिनयगुणसंपन्न, टॅलेंटेड कलाकार तेवढाच तो स्वभावाने मस्तीखोर. आपल्या सहकलाकारांच्या, क्रू सदस्यांच्या खोड्या काढण्यात एकदम पटाईत. खोडी तो एकटाच करत नाही, तर सेटवरील इतर सगळ्यांनाही त्यात सामील करून घेतो. श्रेयसने अशीच धमाल उडवून दिली, ती आगामी ‘बाजी’ चित्रपटाच्या सेटवर. श्रेयसच्या या फिरकीला बळी पडला, तो सेटवरचा छायाचित्रकार...! या सगळ्यांनी बिचाऱ्या त्या फोटोग्राफरला सांगितलं की, महत्त्वाचा आणि कठीण असा स्टंट करणाऱ्या क्रूपैकी एक जण आजारी पडलाय आणि त्याच्या जागी तुला काम करायचंय. हाणामारीच्या या सीनमध्ये एका गुंडावर जोरदार लत्ताप्रहार करून जमिनीवर पडायचं, अशा प्रकारचा तो स्टंट होता. हा स्टंट करताना आपल्याला भाजेल, जखम होईल या भीतीने त्या फोटोग्राफरची पार गाळण उडाली. घाबरलेला हा फोटोग्राफर कसाबसा स्टंट सीन करण्यासाठी तयार झाला खरा. पण त्याला असा सहजपणे सोडेल तो श्रेयस कसला? शूटिंगची वेळ झाल्यावर तयार होऊन बसलेल्या फोटोग्राफरला एवढा वेळ वाट पाहायला लावली, की तो बिचारा फार टरकून गेला. सरतेशेवटी त्या शॉटची वेळ आली आणि काय सगळे जोरजोरात हसू लागले. या भोळ्या फोटोग्राफरला काय चाललंय, काही उमजेना. तो भांबावून सगळ्यांकडे पाहायला लागला आणि मग सगळ्यांनी त्याला खरी गोष्ट उलगडून सांगितली. आपल्याला बकरा बनवल्याचं त्याच्या लक्षात आलं, मग सगळ्यांबरोबर तोसुद्धा हसू लागला.

Web Title: Shreyas spin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.