लवकरच ‘एबीसीडी-२’चे शूटिंग : लॉरेन
By Admin | Updated: October 8, 2014 00:31 IST2014-10-08T00:31:05+5:302014-10-08T00:31:05+5:30
एबीसीडी-२ लवकरच सुरू होत असून या चित्रपटाच्या शूटिंगसाठी मी लॉस वेगास येथे जाण्याची तयारी करीत आहे. ‘एबीसीडी-२’मध्ये वरुण धवन आणि श्रद्धा कपूरही मुख्य भूमिकेत आहेत,

लवकरच ‘एबीसीडी-२’चे शूटिंग : लॉरेन
मागील वर्षी ‘एनीबडी कॅन डान्स’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी आंतरराष्ट्रीय डान्सर लॉरेन गोतलीब या चित्रपटाच्या सिक्वलचे शूटिंग लॉस वेगास येथे सुरू करणार आहे. एका कार्यक्रमादरम्यान या चित्रपटाच्या शेड्यूलबाबत बोलताना लॉरेन म्हणाली की, ‘एबीसीडी-२ लवकरच सुरू होत असून या चित्रपटाच्या शूटिंगसाठी मी लॉस वेगास येथे जाण्याची तयारी करीत आहे. ‘एबीसीडी-२’मध्ये वरुण धवन आणि श्रद्धा कपूरही मुख्य भूमिकेत आहेत, सध्या लॉरेन त्यांच्यासोबत काम करण्याचा आनंद घेत आहे. लॉरेन म्हणाली की, ‘पूर्वाभ्यास सुरू झाला असून मी आणि वरुण काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करीत आहोत. तो आणि श्रद्धा खूपच मेहनती आहेत. आम्ही मज्जा करीत आहोत.’