मराठी-हिंदी वादात शिल्पा शेट्टीची उडी, म्हणाली- "मी महाराष्ट्राची मुलगी, पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 16:52 IST2025-07-10T16:51:50+5:302025-07-10T16:52:16+5:30

मीरा-भाईंदरमध्ये मनसैनिकांनी व्यापाराला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा वाद आणखी तीव्र झाला आहे. यावर अनेक सेलिब्रिटीही व्यक्त होत आहेत. आता बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

shilpa shetty reaction on marathi hindi langauge row said im maharashtrian mulgi | मराठी-हिंदी वादात शिल्पा शेट्टीची उडी, म्हणाली- "मी महाराष्ट्राची मुलगी, पण..."

मराठी-हिंदी वादात शिल्पा शेट्टीची उडी, म्हणाली- "मी महाराष्ट्राची मुलगी, पण..."

राज्य सरकारने त्रिभाषा सूत्रानुसार पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयापासून सुरू झालेला विरोध हा हिंदी-मराठी वादापर्यंत येऊन पोहोचला आहे. मीरा-भाईंदरमध्ये मनसैनिकांनी व्यापाराला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा वाद आणखी तीव्र झाला आहे. यावर अनेक सेलिब्रिटीही व्यक्त होत आहेत. आता बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

शिल्पा शेट्टी केडी(KD) या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या टीझर लाँचला शिल्पा शेट्टीने हजेरी लावली होती. यावेळी तिला मराठी-हिंदी वादावर प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देत शिल्पाने मी महाराष्ट्राची मुलगी असल्याचं म्हटलं. नेमकं काय म्हणाली शिल्पा शेट्टी, जाणून घेऊया. 

मराठी-हिंदी वादावर शिल्पा शेट्टीची प्रतिक्रिया

"मी महाराष्ट्राची मुलगी आहे. पण, आज आपण केडी सिनेमाबद्दल बोलत आहोत. पण, यात तुम्ही असे प्रश्न विचारून या वादाला प्रोत्साहन देऊ इच्छित असाल तर मी तसं करणार नाही. हा सिनेमा अनेक भाषांमध्ये रिलीज होणार आहे. आपण मराठीतही हा सिनेमा डब करू शकतो". 

शिल्पा शेट्टीचा 'केडी-द डेव्हिल' हा सिनेमा २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात शिल्पा शेट्टी, संजय दत्त, नोरा फतेही, विजय सेतुपथी, अमजाद कुरेशी अशी स्टारकास्ट आहे. 

Web Title: shilpa shetty reaction on marathi hindi langauge row said im maharashtrian mulgi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.