शिल्पा शेट्टी - राज कुंद्राच्या नात्यात दुरावा?

By Admin | Published: June 2, 2016 04:31 PM2016-06-02T16:31:41+5:302016-06-02T16:34:23+5:30

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा या दोघांच्याही नात्यात दुरावा आला असून राज गेल्या १५ दिवसांत एकदाही घरी फिरकलेला नाही.

Shilpa Shetty - Due to Raj Kundra's relationship? | शिल्पा शेट्टी - राज कुंद्राच्या नात्यात दुरावा?

शिल्पा शेट्टी - राज कुंद्राच्या नात्यात दुरावा?

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ०२ - बॉलीवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून घटस्फोटांचा सिलसिला सुरु आहे. फरहान अख्तर-अधुरा, अरबाज-मलायका यांच्या घटस्फोटाच्या वृत्तानंतर आता बॉलिवूडमधील आणखी एक कपल विभक्त होण्याच्या मार्गावर असल्याचे वृत्त आहे. आणि ते कपल म्हणजे अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा... या दोघांचेही नाव आता या यादीत जोडले जाण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या मते शिल्पा आणि राज यांच्या सध्या काही आलबेल नसून त्यांच्यात दुरावा आला आहे.
 
( बाळंतपणानंतर वाढलेले 21 किलो वजन शिल्पा शेट्टीनं 3 महिन्यांत घटवलं)
  •  
स्पॉटबॉय डॉट कॉमने दिलेल्या बातमीनुसार, गेल्या काही दिवसांपासून राज कुंद्रा हा ऑफिसमध्येच राहत आहे. ऑफिस मुंबईत असूनही ते गेल्या १५ दिवसांत घरी गेलेच नाहीत. राज यांचे ऑफिस वांद्र्यात तर घर जुहू परिसरात आहे. मिळालेल्.या माहितीनुसार राज हे फक्त एकदाच, कपडे आणण्यासाठी घरी गेले असून तब्बल १५ दिवसांपासून त्यांचा मुक्काम ऑफिसमध्येच आहे. राज यांच्या या वागणुकीवरुन शिल्पा आणि राज यांच्यात काहीतरी बिनसल्याची चर्चा सुरु आहे. २००९मध्ये शिल्पा आणि राज विवाहबंधनात अडकले होते, त्यांना विवान नावाच एक मुलगाही आहे. 
 

 

Web Title: Shilpa Shetty - Due to Raj Kundra's relationship?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.