बिग बींच्या भूमिकेत शाहरुख
By Admin | Updated: August 25, 2014 04:58 IST2014-08-25T04:57:47+5:302014-08-25T04:58:38+5:30
सूत्रांनुसार दिग्दर्शक रोहित शेट्टी सध्या त्याच्या आगामी चित्रपटाचे स्क्रिप्ट लिहिण्यात मग्न आहे. या चित्रपटात शाहरुख खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

बिग बींच्या भूमिकेत शाहरुख
सूत्रांनुसार दिग्दर्शक रोहित शेट्टी सध्या त्याच्या आगामी चित्रपटाचे स्क्रिप्ट लिहिण्यात मग्न आहे. या चित्रपटात शाहरुख खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सूत्रांनुसार मुकुल आनंद यांच्या ‘हम’ या हिट चित्रपटाचा रिमेक रोहित बनवत आहे. या चित्रपटात शाहरुख बिग बी अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेत दिसणार असून रजनीकांत आणि गोविंदाच्या भूमिकांसाठी सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवनच्या नावांची चर्चा सुरू आहे. अद्याप चित्रपटातील कलाकारांची निवड करण्यात आलेली नाही. अभिनेत्री काजोलही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. रोहित या चित्रपटाला त्याच्या स्टाईलचा एक टच देऊ इच्छितो, त्यानुसारच तो या स्क्रिप्टवर काम करीत असल्याचे कळते. सूत्रांनुसार शाहरुख-काजोल या हिट जोडीला पुन्हा पडद्यावर आणण्याची त्याची इच्छा आहे.