शाहरुख खानचा मुलगा शोभतो! 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'ची पहिली झलक समोर, आर्यन खानचा दमदार अभिनय
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 13:19 IST2025-08-17T13:16:48+5:302025-08-17T13:19:09+5:30
दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या माध्यमातून स्वतःची छाप सोडली आहे. या सीरिजचा पहिला लूक समोर येताच सर्वांनी प्रेम दर्शवलं आहे

शाहरुख खानचा मुलगा शोभतो! 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'ची पहिली झलक समोर, आर्यन खानचा दमदार अभिनय
आर्यन खान हा बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा. आर्यनने आज आपल्या पहिल्या प्रोजेक्टची एक झलक प्रेक्षकांसमोर आणली आहे. आर्यनची वेब सिरीज “द बॅड्स ऑफ बॉलिवूड” या नावाने लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सीरिजचा पहिला लूक नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. आर्यनची कमाल अॅक्टिंग पाहून लोकांना शाहरुखची आठवण आली आहे. जाणून घ्या
टीझरमध्ये शाहरुख खानच्या ‘मोहब्बते’ या चित्रपटातील प्रसिद्ध संवाद “एक लड़की थी दीवानी सी…” ऐकायला येतो. पण लगेचच आर्यन त्याला नवा ट्विस्ट देतो—“वह प्यार नहीं अब वार है!” हा दमदार संवाद पाहून चाहत्यांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे. यानंतर या फर्स्ट लूकमध्ये बॉलिवूडमधील ग्लॅमर, संघर्ष, स्पर्धा आणि राजकारण यांचं वेगळं मिश्रण दाखवलं जाणार आहे.
या सीरिजमध्ये लक्ष्य कपूर आणि साहर बंबा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय बॉबी देओल, मोना सिंग, संजय कपूर यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच करण जोहर, सलमान खान आणि रणवीर सिंग यांचे खास कॅमेओ सुद्धा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. इतकंच नव्हे स्वतः शाहरुख खानही या सीरिजमध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे.
Netflix आणि Red Chillies Entertainment यांनी मिळून ही सीरिज तयार केली आहे. “द बॅड्स ऑफ बॉलीवुड” या सीरिजचा पहिला टीझर २० ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. चाहत्यांमध्ये या प्रोजेक्टसाठी मोठी उत्सुकता आहे, कारण आर्यन खान पहिल्यांदाच या सीरिजनिमित्त दिग्दर्शक म्हणून समोर येत आहे. शाहरुख खानच्या रोमँटिक इमेजच्या अगदी विरुद्ध असलेली ही सीरिज एका वेगळ्यात थीमवर आधारीत आहे. आर्यन खानच्या या पदार्पणामुळे बॉलिवूडला एक नवा दिग्दर्शक मिळत असून त्याच्याकडून आणखी धाडसी आणि हटके प्रोजेक्ट्सची चाहत्यांना अपेक्षा आहे.