‘मन्नत’ शाहरूखच्याच नशीबात असावा..! ती ‘डील’ फसली नसती तर सलमान खान असता मालक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 08:00 IST2021-11-02T08:00:00+5:302021-11-02T08:00:02+5:30

Shah Rukh Khan Birthday, Mannat :   आज सुमारे 200 कोटी किंमत असलेल्या ‘मन्नत’ नावाच्या अलिशान बंगल्यात शाहरूख राहतो. पण शाहरूखचा हाच ‘मन्नत’ नावाचा अलिशान बंगला एकेकाळी सलमान खान खरेदी करणार होता.

Shahrukh Khan Birthday special Salman Khan revealed shocking thing says SRK bungalow mannat offered to him first. | ‘मन्नत’ शाहरूखच्याच नशीबात असावा..! ती ‘डील’ फसली नसती तर सलमान खान असता मालक

‘मन्नत’ शाहरूखच्याच नशीबात असावा..! ती ‘डील’ फसली नसती तर सलमान खान असता मालक

बॉलिवूडचा ‘किंगखान’ शाहरूख खान (Shah Rukh Khan) गेल्या महिनाभरापासून सतत चर्चेत आहे. मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक झाली आणि शाहरूख तहान-भूक सगळं विसरला. 27 दिवसानंतर आर्यन जामीनावर सुटला, तेव्हा कुठे त्याच्या जीवात जीव आला. आर्यन घरी पतरल्यानं ‘मन्नत’मध्ये आनंदाचं वातावरण आहे. शिवाय आज (2 नोव्हेंबर)शाहरूखचा वाढदिवस (Shah Rukh Khan Birthday) असल्याने या आनंदात भर पडली आहे. ‘मन्नत’वर दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. आज याच ‘मन्नत’बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

आज सुमारे 200 कोटी किंमत असलेल्या ‘मन्नत’ नावाच्या अलिशान बंगल्यात शाहरूख राहतो. पण शाहरूखचा हाच ‘मन्नत’ (Mannat) नावाचा अलिशान बंगला एकेकाळी सलमान खान खरेदी करणार होता.
होय, फार कमी ठाऊक असेल की, शाहरुख आधी हे घर सलमान खान विकत घेणार होता. पण डील फसली. ही डील फसण्यामागचं कारण काय तर  तर सलमानचे अब्बा सलीम खान. सलमानने एका मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला होता.
 त्याने सांगितलं होतं की, शाहरूखने ‘मन्नत’ खरेदी केला. पण त्याआधी मला हा बंगला खरेदी करण्याची ऑफर मिळाली होती. पण पापाने हा बंगला खरेदी करण्यास नकार दिला. इतका मोठा बंगला घेऊन काय करायचं? असं पापांचं मत पडलं. मग काय मी हा बंगला खरेदी करण्याचा विचार सोडून दिला.
 सलीम खान यांनी नकार दिल्यानंतर सलमान शांत झाला.  कदाचित हा बंगला शाहरूखच्याच नशीबात लिहिलेला असावा. त्यानुसार शाहरूखने हा बंगला खरेदी केला. पाहताक्षणीत शाहरूख या बंगल्याच्या प्रेमात पडला होता.
 
आणि शाहरूखने ‘मन्नत’ घ्यायचा निर्धार केला
शाहरूखने एका रेडिओ शोमध्ये याबद्दल सांगितलं होता. ‘मी दिल्लीत राहिलेला असल्याने मला मोठ्या घरात राहण्याची सवय होती. गौरीसोबत मुंबईत आल्यावर आम्ही एका लहानशा अपार्टमेंटमध्ये राहू लागलो. तुम्ही इतक्या लहान घरात कसे काय राहता, असं माझी सासूबाई आम्हाला नेहमी म्हणायची. पुढे मी ‘मन्नत’ पाहिला आणि पाहताक्षणीच मी या बंगल्याच्या प्रेमात पडलो. दिल्लीसारखं घर, हा एकच विचार माझ्या मनात आला आणि मी हा बंगला खरेदी करण्याचा निर्धार केला,’असं शाहरूखने सांगितलं होतं.
 
स्ट्रगल काळात किंग खान कित्येक वेळा या बंगल्याबाहेर उभा राहून स्वत:चे फोटो काढायचा. 1997 मध्ये ‘यस बॉस’ या चित्रपटावेळी शाहरुखने पहिल्यांदाच मन्नत आतून पाहिला होता.

13 कोटीत खरेदी केला आज 200 कोटी आहे किंमत
शाहरुखने मन्नतची खरेदी करण्यापूर्वी नरिमन दुबास या गुजराती व्यवसायिकाचं हे घर होतं. मात्र, नरिमन यांनी हा बंगला शाहरुखला विकला.  त्यावेळी शाहरुखने 13 कोटींमध्ये या घराची खरेदी केली होती. आज या बंगल्याची किंमत जवळपास 200 कोटी रुपयांच्या आसपास आहे. आज मन्नत या नावाने ओळखलं जाणारं शाहरुखचं घर पूर्वी विला विएना (Villa Vienna) या नावाने ओळखलं जायचं. हे या घराचं पहिलं नाव होतं. त्यानंतर शाहरुखने या बंगल्याची खरेदी केल्यावर त्याचं नाव मन्नत असं ठेवलं.

Web Title: Shahrukh Khan Birthday special Salman Khan revealed shocking thing says SRK bungalow mannat offered to him first.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.