दुहेरी भूमिकांचा मास्टर ठरला शाहरुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2016 00:51 IST2016-04-18T00:51:25+5:302016-04-18T00:51:25+5:30
शाहरुख खान बऱ्याच काळानंतर ‘फॅन’ या चित्रपटात पुन्हा एकदा डबल रोलमध्ये पडद्यावर दिसत आहे. डबल रोलबाबत बॉलीवूड स्टार्समध्ये नेहमी क्रेझ असते. दिग्गज स्टार्सच्या मते डबल रोलच्या

दुहेरी भूमिकांचा मास्टर ठरला शाहरुख
शाहरुख खान बऱ्याच काळानंतर ‘फॅन’ या चित्रपटात पुन्हा एकदा डबल रोलमध्ये पडद्यावर दिसत आहे. डबल रोलबाबत बॉलीवूड स्टार्समध्ये नेहमी क्रेझ असते. दिग्गज स्टार्सच्या मते डबल रोलच्या मसाला चित्रपटांना मोठे यश मिळते असे मानले जाते. म्हणूनच प्रत्येक दिग्गज स्टार आपल्या करिअरमध्ये कधी ना कधी दुहेरी भूमिका साकारण्याची इच्छा ठेवतो. याला शाहरुख खानदेखील अपवाद नाही. त्याने ‘फॅन’च्या आधीही चार चित्रपटांत दुहेरी भूमिक ा केल्या आहेत. पहिल्यांदा १९९८ मध्ये महेश भट्टच्या निर्देशनात बनलेला धर्मा प्रोडक्शनचा चित्रपट ‘डुप्लिकेट’मध्ये त्याने डबल रोल केला होता. यात एक होता गँगस्टर मुन्नू आणि दुसरा होता, हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करणारा बबलू. चेहरा एकसारखा असल्याने मुन्नू आणि बबलू दोन्हीही संकटात सापडतात आणि एक-दुसऱ्यासाठीही समस्या निर्माण करतात, अशी या चित्रपटाची कथा होती. बॉक्स आॅफिसवर हा चित्रपट स्मॅश हिट ठरला होता. दुसऱ्यांदा अमिताभ बच्चनचा चित्रपट ‘डॉन’च्या रिमेकमध्ये शाहरुख खानने डबल रोल केला. बनारसी पान खाणारा विजय आणि दुसरा डॉन, ज्याला ११ ठिकाणांचे पोलीस शोधत असतात. या दोन्ही रोलमध्ये शाहरुख खानची तुलना बिग बींशी झाली. मात्र, ही भूमिका कुणाला आवडली तर कुणाला नाही. तरीही बॉक्स आॅफिसवर हा चित्रपट चांगला व्यवसाय करण्यात यशस्वी ठरला. डबल रोलमध्ये शाहरुख खानचा तिसरा चित्रपट होता ‘पहेली’ ज्याला त्याने स्वत:च्या प्रोडक्शनमध्ये बनविले होते. अमोल पालेकरच्या दिर्ग्दशनात बनलेला हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर अपयशी ठरला होता. शाहरुख खानच्या प्रोडक्शनमध्येच फरहा खानने ‘ओम शांती ओम’ बनविला होता. मागील जन्माच्या कथेवर आधारित या चित्रपटात फिल्मी मसाल्याची कमतरता नव्हती, म्हणूनच ‘ओम शांती ओम’ सुपरहिट ठरला.
- anuj.alankar@lokmat.com