फॅनमध्ये शाहरुखचा डबल रोल
By Admin | Updated: October 11, 2014 04:49 IST2014-10-11T04:49:16+5:302014-10-11T04:49:16+5:30
सध्या शाहरुख खान हॅप्पी न्यू ईअर या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. हा चित्रपट रिलीज होताच तो फॅन या चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे

फॅनमध्ये शाहरुखचा डबल रोल
सध्या शाहरुख खान हॅप्पी न्यू ईअर या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. हा चित्रपट रिलीज होताच तो फॅन या चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा करीत आहे. या चित्रपटात शाहरुखचा डबल रोल असणार आहे. त्याची एक भूमिका सुपरस्टारची आहे, तर दुसरी एका सामान्य युवकाची. या चित्रपटाच्या कथेबाबत सूत्रांनी सांगितले की, ‘सुपरस्टारचे वय झालेले आहे आणि त्यामुळे तो चिंतेत आहे. जेव्हा त्याला त्याच्यासारखा दिसणारा तरुण दिसतो, तेव्हा तो त्याची जागा त्या तरुणाला देतो आणि स्वत:ला लपवतो. यामुळे तो जास्त काळ सुपरस्टार राहील, असे त्याला वाटत असते. अद्याप या चित्रपटाची हिरोईन ठरलेली नाही. परिणिती चोप्रापासून ते सोनम कपूरपर्यंत अनेक अभिनेत्रींच्या नावावर सध्या विचार सुरू असल्याचे कळते.