‘अल्विन कालिचरण’ बनणार शाहरुख
By Admin | Updated: December 24, 2014 23:29 IST2014-12-24T23:29:16+5:302014-12-24T23:29:16+5:30
अभिनेता शाहरुख खान दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या आगामी चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे. अनुराग सध्या रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांना घेऊन ‘

‘अल्विन कालिचरण’ बनणार शाहरुख
अभिनेता शाहरुख खान दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या आगामी चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे. अनुराग सध्या रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांना घेऊन ‘बॉम्बे वेल्वेट’ नावाचा चित्रपट बनवीत आहे. यानंतर तो शाहरुख खानला घेऊन
‘अल्विन कालिचरण’ नावाचा चित्रपट बनविणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाची निर्मिती
अनुराग कश्यप आणि शाहरुख खान मिळून करणार
आहेत. अनुरागने ‘अल्विन कालिचरण’ या चित्रपटाची स्क्रिप्ट १०-१२ वर्षांपूर्वी
अनिल कपूरला डोळ्यासमोर ठेवून लिहिली होती.
त्यावेळी अनुराग आणि टुटू शर्मा मिळून हा चित्रपट बनवणार होते; पण तेव्हा ते शक्य झाले नाही. आता हा चित्रपट बनविण्याची अनुरागची इच्छा आहे.