‘रईस’मध्ये शुभम बनला छोटा शाहरुख
By Admin | Updated: July 11, 2016 01:36 IST2016-07-11T01:36:12+5:302016-07-11T01:36:12+5:30
शाहरूख खानची भूमिका करायला कोणाला नाही आवडणार. आजही आपल्या या किंग खानसोबत एका फ्रेममध्ये काम करण्यासाठी मोठे-मोठे स्टार्स प्रतीक्षेत असतात

‘रईस’मध्ये शुभम बनला छोटा शाहरुख
शाहरूख खानची भूमिका करायला कोणाला नाही आवडणार. आजही आपल्या या किंग खानसोबत एका फ्रेममध्ये काम करण्यासाठी मोठे-मोठे स्टार्स प्रतीक्षेत असतात. अशीच बॉलीवूडच्या या बादशाहसोबत काम करण्याची लॉटरी लागली आहे आपल्या मराठमोळ््या मुलाची. हाफ तिकीट या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणारा शुभम मोरे शाहरूखच्या ‘मोस्ट अवेटेड रईस’ या चित्रपटात शाहरूखच्या लहानपणीची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेबद्दल शुभमने सीएनएक्सला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत सांगितले की, ‘मला रईसमधील शाहरूख खान यांच्या लहानपणीच्या भूमिकेसाठी फोन आला. मला खरच खूप आनंद झाला. माझी शूटिंग कम्प्लिट झाली आहे. एके दिवशी ते सेटवर मला भेटायलादेखील आले होते. माझे सीन्स पाहून त्यांनी मला तू खूप छान काम केले आहेस, अशी कॉम्प्लिमेंटसुद्धा दिली. आम्ही एकत्र फोटोज काढले. शाहरूख खान यांना चित्रपटांमध्येच पाहिले होते, पण प्रत्यक्षात जेव्हा भेटलो, तेव्हा त्यांच्याशी बोलून खूपच छान वाटले. आमचे एकत्र सीन्स जरी नसले, तरी त्यांच्या लहानपणीचा रोल साकारण्याची संधी मला मिळाली, यासाठी मी हॅपी आहे. आता रईस प्रदर्शित झाल्यावरच आपल्याला या मराठमोळ््या छोट्या शाहरूखची रईसगिरी पडद्यावर पाहायला मिळेल.