‘हॅप्पी बर्थडे सुनीता’मध्ये शबाना
By Admin | Updated: August 26, 2014 02:13 IST2014-08-26T02:13:46+5:302014-08-26T02:13:46+5:30
अभिनेत्री शबाना आजमी लवकरच दोन महिन्यांसाठी लंडनला जात आहेत. पुरस्कार विजेती थिएटर कंपनी रिफ्को आर्टस्च्या ‘हॅप्पी बर्थडे सुनीता’ या नाटकात त्या अभिनय करीत आहेत.

‘हॅप्पी बर्थडे सुनीता’मध्ये शबाना
अभिनेत्री शबाना आजमी लवकरच दोन महिन्यांसाठी लंडनला जात आहेत. पुरस्कार विजेती थिएटर कंपनी रिफ्को आर्टस्च्या ‘हॅप्पी बर्थडे सुनीता’ या नाटकात त्या अभिनय करीत आहेत. ब्रायन सेवरी आणि परवेशकुमार हे या नाटकाचे दिग्दर्शक आहेत. हॅप्पी बर्थडे सुनीतामध्ये शबाना आजमी एका मध्यमवर्गीय पंजाबी गृहिणीच्या भूमिकेत आहेत. त्यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. शबाना लिहितात, ‘हॅप्पी बर्थडे सुनीतामध्ये अभिनय करण्यासाठी मी दोन महिन्यांसाठी ब्रिटनला जात आहे, मला शुभेच्छा द्या. या नाटकात शबाना आजमी यांच्यासह अमित चाना, रशेल फ्लॉयड, क्लारा इंद्रामी आणि गोल्डी नोटाय यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.