रणबीरच्या 'संजू' सिनेमाचा ट्रेलर पाहून काय म्हणाली आलिया?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2018 16:39 IST2018-05-30T16:38:32+5:302018-05-30T16:39:07+5:30
सर्वसामान्य प्रेक्षकांसोबतच बॉलिवूडमधील कलाकारही या ट्रेलरचं भरभरुन कौतुक करत आहेत. अभिनेत्री आलिया भटनेही या ट्रेलरवर प्रतिक्रिया दिली आहे.

रणबीरच्या 'संजू' सिनेमाचा ट्रेलर पाहून काय म्हणाली आलिया?
मुंबई : रणबीर कपूर याच्या संजू सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून सगळीकडे सध्या याच ट्रेलरची चर्चा रंगली आहे. सर्वसामान्य प्रेक्षकांसोबतच बॉलिवूडमधील कलाकारही या ट्रेलरचं भरभरुन कौतुक करत आहेत. अभिनेत्री आलिया भटनेही या ट्रेलरवर प्रतिक्रिया दिली आहे.
राजकुमार हिराणी यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा संजय दत्त याच्या जीवनावर आधारीत सिनेमा आहे. त्याच्या जीवनातील अनेक गोष्टींचा उलगडा या सिनेमातून केला जाणार आहे. आलियाने हा ट्रेलरपाहून ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे.
Blownnnnnn away ❤️❤️❤️❤️❤️✨@RajkumarHirani#RanbirKapoor@sonamakapoor@AnushkaSharma@vickykaushal09@deespeak#SanjuTrailer
— Alia Bhatt (@aliaa08) May 30, 2018
रणबीर कपूरसोबतच या सिनेमात सोनम कपूर, अनुष्का शर्मा, विकी कौशल, दिया मिर्या, परेश रावल यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. गेल्या काही दिवसांपासून रणबीर आणि आलियाच्या अफेअरच्या चर्चा जोरदार रंगल्या आहेत. त्यामुळे तिने दिलेली ही प्रतिक्रियाही अनेकांचे लक्ष वेधून घेणारी आहे.