संगीता घोष झळकणार चक्रव्यूह या मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2017 16:46 IST2017-06-12T11:16:03+5:302017-06-12T16:46:03+5:30
संगीता घोषने हम हिंदुस्थानी या मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या मालिकेच्या वेळी ती केवळ दहा वर्षांची होती. त्यानंतर ...

संगीता घोष झळकणार चक्रव्यूह या मालिकेत
स गीता घोषने हम हिंदुस्थानी या मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या मालिकेच्या वेळी ती केवळ दहा वर्षांची होती. त्यानंतर तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केले. कुरूक्षेत्र, अक्षिकार, अजीब दास्तान, दरार यांसारख्या मालिकांमध्ये ती झळकली. देस में निकला होगा चाँद या मालिकेमुळे तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. तसेच मेहेंदी तेरे नाम की या मालिकेत तिने साकारलेली मुस्कान ही भूमिका चांगलीच गाजली होती. ती झलक दिखला जा या रिअॅलिटी शो मध्ये देखील झळकली होती. 2010 नंतर ती छोट्या पडद्यापासून गायब झाली होती. कहता है दिल जी ले जरा या मालिकेद्वारे ती छोट्या पडद्यावर परतली. तसेच तिने परवरिश या मालिकेत देखील काम केले. परवरिश या मालिकेनंतर गेल्या काही महिन्यात ती कोणत्याच मालिकेत झळकली नाही. आता ती आता चक्रव्यूह या मालिकेत दिसणार आहे.
चक्रव्यूह या मालिकेची कथा ही खूप वेगळी असून प्रेक्षकांना माय-लेकीची कथा या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेत माय-लेकींमधील कडवट कथा गुंफण्यात आली असून कथानक एका शाही औद्योगिक घराण्याशी संबंधित आहे. या मालिकेत नारायणी शास्त्री महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. तसेच महिमा मकवाणा अनामी ही एक महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.
संगीता घोष देखील या मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ती या मालिकेत सुधा ही भूमिका साकारणार आहे. सुधा या भूमिकेला नकारात्मक छटा असून या भूमिकेमुळे कथानकाला अनेक वळणे मिळणार आहेत. या भूमिकेसाठी संगीता घोषच योग्य असल्याचे या मालिकेच्या निर्माता-दिग्दर्शकाचे म्हणणे आहे.