रणबीरच्या "लीक माय शू" वादग्रस्त डायलॉगवर संदीप रेड्डी वांगानं सोडलं मौन, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 14:20 IST2023-12-20T14:18:02+5:302023-12-20T14:20:50+5:30
'ॲनिमल' चित्रपटामधील रणबीरच्या 'लीक माय शू' या डायलॉगनं अनेकांचे लक्ष वेधले.

रणबीरच्या "लीक माय शू" वादग्रस्त डायलॉगवर संदीप रेड्डी वांगानं सोडलं मौन, म्हणाला...
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरचा ॲक्शन आणि ड्रामाने पुरेपूर असलेला 'ॲनिमल' हा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 'ॲनिमल'मधील सीन्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या चित्रपटाचं अनेक जण कौतुक करत आहेत. पण या चित्रपटामधील काही डायलॉग्सला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. चित्रपटामधील रणबीरच्या 'लीक माय शू' या डायलॉगनं देखील अनेकांचे लक्ष वेधले. अशातच आता या डायलॉगवर 'ॲनिमल' चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगानं मौन सोडलं आहे.
'लीक माय शू' या डायलॉगबाबत संदीप रेड्डी वांगा म्हणाले, 'तो एक भावनिक सीन होता, पण प्रेक्षकांना ते काहीतरी वेगळंच समजलं. रणविजय या सीनमध्ये गोंधळलेला आहे. कारण कुठेतरी तो झोयाशी जोडला गेला आहे आणि त्याला त्याची जाणीवही नाही. तो विवाहित आणि दोन मुलांचा बाप आहे. अशा परिस्थितीत झोयासोबतचा सहवास त्याला त्रास देत आहेत'.
The connection of Ranvijay and Zoya will be explored in #AnimalPark - Sandeep Reddy Vanga pic.twitter.com/dxTH6fqwzU
— RKᴬ (@seeuatthemovie) December 19, 2023
पुढे ते म्हणाले, 'जेव्हा झोयाने रणविजयला प्रपोज केले. तेव्हा तो नाराज होतो आणि रागाने झोयाला त्याचे बूट चाटण्यास सांगतो. त्याच्या मनात भावनांचा गोंधळ उडालेला आहे. तिने आपल्या धोका दिलाय आणि आपणही तिला डबल धोका दिलाय, हे तो जाणून आहे. तरीही तिच्याशी झालेलं कनेक्शन त्याला त्रास देत आहे. हे दृश्य रणविजयच्या भावना आणि रागाची एक प्रतिक्रिया आहे. यात चुकीचे काहीही नाही, पण प्रेक्षकांनी तो सीन वेगळ्या दृष्ट्रीकोनातून पाहिला'.
अॅनिमल चित्रपटाच्या एका सीनमध्ये दाखवण्यात आलं आहे की, रणबीर कपूरचे पात्र तृप्तीला तिचे त्याच्यावरील प्रेम सिद्ध करण्यासाठी त्याचे बूट चाटण्यास सांगते. तो तिला 'लीक माय शू' असं म्हणतो. 'ॲनिमल'मध्ये रणबीर कपूरबरोबर अनिल कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. संदीप वांगा रेड्डी यांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर डंका वाजवला आहे.