सलमानवर जॅकलन फिदा

By Admin | Updated: November 3, 2014 01:52 IST2014-11-03T01:52:01+5:302014-11-03T01:52:01+5:30

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ही सध्या कुठेही जावो सलमान खानची तोंडभरून स्तुती करीत आहे. ‘किक’मधील आपल्या सहकाऱ्यावर ती जाम फिदा झाली असल्याचे दिसून येते

Salman's Jacqueline Fida | सलमानवर जॅकलन फिदा

सलमानवर जॅकलन फिदा

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ही सध्या कुठेही जावो सलमान खानची तोंडभरून स्तुती करीत आहे. ‘किक’मधील आपल्या सहकाऱ्यावर ती जाम फिदा झाली असल्याचे दिसून येते. ‘सलमान हा एक अद्भुत मनुष्य आहे. त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव काही वेगळाच होता,’ असे जॅकलीनचे म्हणणे आहे. सलमान हा गर्विष्ठ असून, सहकलाकारांसोबत त्याची वर्तणूक असभ्यपणाची असल्याची टीका अनेक जण करीत असतात; परंतु प्रत्यक्षात तसे नाही. सलमान हा सहकलाकारांना सेटवर आदेश देत नाही. आपले मत दुसऱ्यावर तो कधीही लादत नाही. ज्यावेळी त्याच्या मदतीची अपेक्षा असते तेव्हा तो कायम तत्पर असतो, असे जॅकलीनने स्पष्ट केले. जॅकलीन ही सध्या रणबीर कपूरसोबत ‘रॉय’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ‘डेफिनेशन आॅप फिअर’ या हॉलीवूडपटातही ती दिसणार आहे.

Web Title: Salman's Jacqueline Fida

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.