सलमान-युलिया जस्ट फ्रेंड्स?
By Admin | Updated: August 26, 2016 06:54 IST2016-08-26T06:54:37+5:302016-08-26T06:54:37+5:30
सलमान खान आणि युलिया वेंटर हे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा बी टाऊनमध्ये गरम असते.

सलमान-युलिया जस्ट फ्रेंड्स?
सलमान खान आणि युलिया वेंटर हे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा बी टाऊनमध्ये गरम असते. ते दोघेही नेहमीच त्यांच्या नात्याबद्दल बोलणे टाळतात.
पण, असे कळाले की, एका मुलाखतीदरम्यान बोलताना युलिया म्हणते, आम्ही दोघे जस्ट फ्रेंड्स आहोत. आमच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर व्हायचे असेल तर होईल पण, आम्ही कितपत ते प्रेम टिकवू शकतो हे काही माहिती नाही. त्यामुळे अफवा पसरवू नका.
आमच्यात मैत्रीच्या पुढे काही होणार असेल तर आम्ही नक्कीच सांगू. सलमान आणि युलिया यांनी एकमेकांसोबत अनेक इव्हेंट्स मध्ये हजेरी लावली आहे. ती खान कुटुंबियांच्या अवतीभोवतीच नेहमी असते. सलमानची बहीण अर्पिता खान शर्माच्या बर्थडेलाही ती होती.