सलमानच करणार बिग बॉसचे सूत्रसंचालन
By Admin | Updated: September 4, 2015 17:58 IST2015-09-04T16:56:41+5:302015-09-04T17:58:11+5:30
बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि बिग बॉसच्या फॅन्ससाठी एक चांगली बातमी आहे. रिअॅलिटी शो 'बिग बॉस-९' साठी सलमान खान होस्ट करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सलमानच करणार बिग बॉसचे सूत्रसंचालन
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.०४ - बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि बिग बॉसच्या फॅन्ससाठी एक चांगली बातमी आहे. रिअॅलिटी शो 'बिग बॉस-९' साठी सलमान खान होस्ट करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे आता सहाव्यांदा सलमान होस्ट म्हणून 'बिग बॉस'मध्ये दिसणार आहे.
गेल्या 'बिग बॉस-८' च्या सत्रात पाच भागांचे होस्ट केल्यानंतर 'बजरंगी भाईजान' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मध्येच सलमानने रामराम केला होता. त्यानंतर 'बिग बॉस'ची धुरा फिल्ममेकर फराह खान हिने सांभाळली होती.
ऑक्टोबरमध्ये होणा-या या रिअॅलिटी शो 'बिग बॉस-९' चे होस्ट म्हणून बजरंगी भाईजान सलामान खान करणार असल्याचे कलर वाहिनीच्या एका वरिष्ठ अधिका-यांने ट्विट केले आहे.
दरम्यान, गेल्या भागात सलमानने बिग बॉस-८ चं होस्टिंग अर्ध्यातून सोडल्यानंतर कार्यक्रमाच्या टीआरपीवर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे निदर्शनास आले होते.