सलमान-सोनाक्षीचे का बिनसले?
By Admin | Updated: December 2, 2014 02:33 IST2014-12-02T02:12:20+5:302014-12-02T02:33:18+5:30
सलमानची बहीण अर्पिताचा विवाह नुकताच पार पडला. विवाह समारंभात ‘सेल्फी’ घेण्यावरून सलमानने अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा सर्वांसमक्ष पाणउतारा केला

सलमान-सोनाक्षीचे का बिनसले?
सलमानची बहीण अर्पिताचा विवाह नुकताच पार पडला. विवाह समारंभात ‘सेल्फी’ घेण्यावरून सलमानने अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा सर्वांसमक्ष पाणउतारा केला. त्यामुळे सोनाक्षी धाय मोकलून रडत होती. सलमान आणि सोनाक्षीमध्ये बिनसल्याची चर्चा त्यानंतर सुरू झाली. ‘दबंग’द्वारे सलमाननेच सोनाक्षीला ब्रेक मिळवून दिला होता, हे विशेष. ‘तेवर’च्या प्रमोशनसाठी ‘बिगबॉस’च्या सेटवर गेलेल्या सोनाक्षीने मात्र या चर्चेचे खंडन केले आहे. अर्पिताच्या लग्नात काहीच घडले नव्हते. सलमानने माझा पाणउतारा केल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत. काही हितशत्रू जाणीवपूर्वक अफवा पसरवीत आहेत, असे सोनाक्षीने सांगितले. सलमानशी पंगा न घेण्याचा सल्ला काही वडीलधाऱ्या मंडळींनी दिल्यानेच सोनाक्षीने घूमजाव केले असल्याचे बोलले जाते.