सलमान का म्हणतोय, I HATE YOU AAMIR ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2016 12:15 IST2016-12-23T12:15:59+5:302016-12-23T12:15:59+5:30

आमिर खानचा ‘दंगल’ रिलीज झाला आणि यामुळे सगळ्यात जास्त जळफळाट  कुणाचा झाला तर सलमान खान याचा. होय, हे आम्ही ...

Salman says, I hate you AAMIR? | सलमान का म्हणतोय, I HATE YOU AAMIR ?

सलमान का म्हणतोय, I HATE YOU AAMIR ?

िर खानचा ‘दंगल’ रिलीज झाला आणि यामुळे सगळ्यात जास्त जळफळाट  कुणाचा झाला तर सलमान खान याचा. होय, हे आम्ही नाही तर खुद्द सलमाननेच कबुल केलेय. तेही सोशल मीडियावर.  सलमानने अद्याप ‘दंगल’ पाहिलेला नाही. पण सलमानच्या कुटुंबाने मात्र ‘दंगल’ पाहिला आणि ‘सुल्तान’पेक्षाही ‘दंगल’ अधिक चांगला असल्याची पावती त्यांनी दिली. यामुळे सलमानचा इतका जळफळाट झाला की, त्याच्या तोंडून सहज ‘आय हेट यू, आमिर’ असे शब्द बाहेर पडले.
आता तुम्ही हे फार सीरिअसली घेतले असेल तर थांबा. सलमान आमिरला आय हेट यू म्हणाला. पण म्हणून काही तो खरचं आमिरचा द्वेष वगैरे करत नाही. खरे तरं हटके पद्धतीने, हटके शब्दांत आणि काहीशा हटके अंदाजात त्याने आमिरची प्रशंसाच केलीय. तेही twitterवरून. ‘माझ्या कुटुंबाने ‘दंगल’ पाहिला आणि हा चित्रपट ‘सुल्तान’पेक्षाही चांगला असल्याचे सांगितले. लव्ह यू पर्सनली आमिर बट हेट यू प्रोफेशनली,’ असे Tweet सलमानने केले.

{{{{twitter_post_id####}}}}


आता सलमानच्या या Tweet ला उत्तर तर मिळालेच हवे. आमिरनेही काहीशा हटक अंदाजात सलमानच्या या टिष्ट्वटला उत्तर दिले. आमिरने लिहिले, ‘सल्लू, तुझ्या द्वेषातही केवळ प्रेम आहे. आय लव्ह यू लाइक आय हेट यू’
एकंदर काय तर सलमान आणि आमिरच्या प्रेमाला twitterवर जणू भरते आले. आता हे प्रेम असेच निरंतर टिकावे, इतकीच काय आपण अपेक्षा करू यात...!! 

आमिरचा ‘दंगल’ हा चित्रपट कुस्तीवर आधारित बाप-लेकींची कहानी आहे. यापूर्वी येऊन गेलेला सलमानचा ‘सुल्तान’ हा चित्रपटही कुस्तीवर आधारित होता.

Web Title: Salman says, I hate you AAMIR?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.