सलमानला मराठीत करायचाय अभिनय
By Admin | Updated: September 18, 2014 00:38 IST2014-09-18T00:38:46+5:302014-09-18T00:38:46+5:30
रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ या चित्रपटात सलमान खानने एक लहानशी भूमिका निभावली होती. आता त्याला मराठी चित्रपटात मुख्य भूमिका निभावण्याची त्याची इच्छा आहे.
सलमानला मराठीत करायचाय अभिनय
रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ या चित्रपटात सलमान खानने एक लहानशी भूमिका निभावली होती. आता त्याला मराठी चित्रपटात मुख्य भूमिका निभावण्याची त्याची इच्छा आहे. सलमानने त्याची ही इच्छा ‘सांगतो ऐका’ या मराठी चित्रपटाच्या म्युङिाक लाँच समारंभात व्यक्त केली. जेव्हा त्याला विचारण्यात आले की, तुला मराठी चित्रपटात काम करायला आवडेल का? त्यावर सलमानचे उत्तर होते, ‘नक्कीच, मला मराठी अॅक्शन चित्रपटांत मुख्य भूमिका निभावण्याची इच्छा आहे. ‘आय लव मराठी’ सिनेमा. ब:याच काळापासून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. मराठी सिनेमा शिखर गाठू शकतो. जमेल तेवढी जनजागृती करणो गरजेचे आहे. सध्या सलमान बिग बॉस 8 मध्ये बिझी आहे. येत्या 21 सप्टेंबरपासून हा शो प्रसारित केला जाणार आहे.