सलमानने शेअर केला शर्टलेस फोटो, 'अंदाज अपना-अपना'मधल्या स्टाइलमध्ये म्हणाला-"एलो जी सनम हम आ गए.."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 11:45 IST2025-04-29T11:44:57+5:302025-04-29T11:45:28+5:30
Salman Khan : सलमान खानने नुकतेच सोशल मीडियावर त्याचे शर्टलेस फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो पूलमध्ये पोज देताना दिसत आहे.

सलमानने शेअर केला शर्टलेस फोटो, 'अंदाज अपना-अपना'मधल्या स्टाइलमध्ये म्हणाला-"एलो जी सनम हम आ गए.."
बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान (Salman Khan) सातत्याने चर्चेत येत असतो. नुकतेच त्याने सोशल मीडियावर शर्टलेस फोटो शेअर केले आहेत, ज्यामुळे तो चर्चेत आला आहे. त्याने फोटोंसोबत त्याच्या 'अंदाज अपना अपना' या हिट चित्रपटातील काही संवादही शेअर केले आहेत.
सोमवारी रात्री सलमानने ट्विटरवर त्याचे शर्टलेस फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तो स्विमिंग पूलमध्ये पोज देताना दिसत आहे. त्याने वेगवेगळे पोझ दिले आणि त्याचे मसल्सही फ्लॉन्ट केले आहेत. सलमानने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'एलो जी सनम हम आ गये, अब इतना भी गुस्सा करो नहीं जानी.' हे ओळी त्याच्या १९९४ च्या 'अंदाज अपना अपना' या चित्रपटातील एका गाण्यातील आहेत.
Eello ji sanam hum aa gaye………….
— Salman Khan (@BeingSalmanKhan) April 28, 2025
Ab itna bhi gussa karo nahin jaani pic.twitter.com/QCo2OJUAGs
'अंदाज अपना अपना' पुन्हा झाला रिलीज
सलमान खानचा हा विनोदी चित्रपट २५ एप्रिल रोजी पुन्हा प्रदर्शित झाला आहे. वितरकांनी एक प्रेस नोट जारी केली आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की चित्रपटाने पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर २५.७५ लाख रुपये, दुसऱ्या दिवशी ४५.५० लाख रुपये आणि तिसऱ्या दिवशी ५१.२५ लाख रुपये कमावले. हा एक विनोदी चित्रपट आहे जो राजकुमार संतोषी यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केला आहे आणि विनय कुमार सिन्हा यांनी निर्मिती केली आहे. यात आमिर खान, रवीना टंडन, करिश्मा कपूर, परेश रावल आणि शक्ती कपूर सारखे कलाकार देखील आहेत.
'सिकंदर' सिनेमाबद्दल
सलमान शेवटचा रश्मिका मंदानासोबत 'सिकंदर'मध्ये दिसला होता. ए.आर. मुरुगदास दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला यांनी केली होती. ३० मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या 'सिकंदर' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नाही.