"अल्लाहने जितकं आयुष्य लिहिलंय...", धमकी प्रकरणावर सलमान खानने पहिल्यांदाच केलं भाष्य

By ऋचा वझे | Updated: March 27, 2025 10:05 IST2025-03-27T10:04:03+5:302025-03-27T10:05:19+5:30

सलमान खानने सिकंदर सिनेमानिमित्त माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्याने लॉरेन्स बिश्नोई प्रकरणावर भाष्य केलं.

salman khan reacts on death threats says everything is in god s hands | "अल्लाहने जितकं आयुष्य लिहिलंय...", धमकी प्रकरणावर सलमान खानने पहिल्यांदाच केलं भाष्य

"अल्लाहने जितकं आयुष्य लिहिलंय...", धमकी प्रकरणावर सलमान खानने पहिल्यांदाच केलं भाष्य

Salman Khan on Death Threats: सलमान खानचा 'सिकंदर' सिनेमा येत्या काही दिवसात प्रदर्शित होत आहे. यामध्ये त्याचा एक्शन अवतार पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमधून तर 'सिकंदर'ची झलक दिसलीच आहे. सलमान स्टाईल एकापेक्षा एक डायलॉग, फुल ऑन एक्शन, सलमान रश्मिका केमिस्ट्रीनेही लक्ष वेधून घेतलंय. दरम्यान कालच सलमानने 'सिकंदर' निमित्ताने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने धमकी प्रकरणावरही भाष्य केलं.

सलमान खानने सिकंदर सिनेमाच्या प्रमोशननिमित्त विविध विषयांवर माध्यमांशी दिलखुलास संवाद साधला. धमक्यांना तर तू घाबरत नाहीस. पण एकूणच या प्रकरणावर काय सांगशील असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तो म्हणाला, "अल्लाह आहे, त्याने जितकं वय लिहिलं आहे ते आहे. कधी कधी जितक्या लोकांना सोबत घेऊन चालावं लागतं. तितक्या अडचणीही वाढत जातात. इथेच प्रॉब्लेम होतो."

मुंबईतील ताज लँड्स एंड हॉटेल मध्ये सलमानने माध्यमांची भेट घेतली. यावेळीही त्याच्याभोवती कडक सुरक्षा होती. गेल्या काही महिन्यांपासून त्याला गँगस्टर lawrence बिश्नोई कडून मिळणाऱ्या धमक्या पाहता त्याची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. यामुळेच 'सिकंदर'चं प्रमोशनही कमी प्रमाणात झालं आहे. 30 मार्च रोजी सिकंदर सर्वत्र प्रदर्शित होत आहे. सिनेमात रश्मिका मंदाना, काजल अग्रवाल, प्रतिक बब्बर, साऊथ अभिनेता सत्यराज यांचीही भूमिका आहे. 

Web Title: salman khan reacts on death threats says everything is in god s hands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.