वर्षाअखेरीस सलमान खान अडकणार लग्नाच्या बेडीत ?
By Admin | Updated: May 6, 2016 19:14 IST2016-05-06T15:32:24+5:302016-05-06T19:14:20+5:30
बॉलिवूड अभिनेता सलमान खानकडे सगळया प्रश्नांची उत्तरे आहेत. पण तो लग्न कधी करणार ? या प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडे नाही.

वर्षाअखेरीस सलमान खान अडकणार लग्नाच्या बेडीत ?
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - बॉलिवूड अभिनेता सलमान खानकडे सगळया प्रश्नांची उत्तरे आहेत. पण तो लग्न कधी करणार ? या प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडे नाही. वेगवेगळया प्लॅटफॉर्मवर जेव्हा पत्रकारांनी त्याला हा प्रश्न विचारला त्यावेळी प्रत्येकवेळी त्याने थेट उत्तर देण्याचे टाळले आणि हसण्यावर विषय नेला.
वयाच्या पन्नाशीत पोहोचलेल्या सलमान विवाहाच्या बोहल्यावर कधी चढणार या प्रश्नाचे उत्तर या वर्षाच्या अखेरीस मिळू शकते. मुंबई मिररच्या वृत्तानुसार सलमान या वर्षाच्या अखेरीस विवाहाच्या बोहल्यावर चढण्याची शक्यता आहे. सलमानची सध्याची गर्लफ्रेंन्ड लुलिया वेंटर फॉरेनर आहे. सलमान तिच्या प्रेमाखातर विवाह करत असेल असे तुम्हाला वाटेल.
पण तुमचा समज चुकीचा आहे. सलमान तिच्यासाठी नव्हे तर, त्याच्या आजारी आईसाठी विवाहाच्या निर्णयाप्रत आला आहे. सलमानने आता घर-संसाराला लागावे अशी त्याच्या आईची इच्छा आहे. आपल्यानंतर सलमानची काळजी घेणारी कोणीतरी असावे असे त्याच्या आईला वाटते.
त्यामुळे सल्लूमिया वर्षअखेरीस विवाहाच्या बंधनात अडकू शकतो. सलमानचा विवाह त्याची फॉरेनर प्रेयसी लुलिया वेंटरशी होईल अशी चर्चा आहे.