सलमान खान- गौतम गंभीर बनणार 'रिश्तेदार'
By Admin | Updated: August 6, 2015 15:27 IST2015-08-06T15:17:04+5:302015-08-06T15:27:21+5:30
बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान आणि भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर लवकरच एकमेकांचे नातेवाईक बनणार आहेत.

सलमान खान- गौतम गंभीर बनणार 'रिश्तेदार'
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान आणि भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर लवकरच एकमेकांचे रिश्तेदार बनणार आहेत. सलमानच्या बहिणीचा दीर आशय आणि गौतम गंभीरची बहिण राधिका यांचा लवकरच विवाह होणार असल्याने सलमान व गौतम एकमेकांचे नातेवाईक बनतील.
सलमान खानची लाडकी बहिण अर्पिता हिचा गेल्या वर्षी आयुश शर्माशी विवाह झाला. आणि आता आयुषचा भाऊ आशय याचा विवाह गौतम गंभीर बहिण राधिका गंभीर हिच्याशी होणार आहे. आशय हा फॅमिली बिझनेस सांभाळतो तर राधिका ही वकील आहे. या दोघांचा साखरपुडा नुकताच पार पडला असून येत्या डिसेंबरमध्ये ते दोघे लग्नगाठीत अडकतील आणि अशा रितीने सलमान आणि गौतम दूर-दूरचे का होईना पण नातेवाईक बनतील.