सलमानवर आहे एलीला विश्वास
By Admin | Updated: October 3, 2014 00:22 IST2014-10-03T00:22:01+5:302014-10-03T00:22:01+5:30
बिग बॉस या रिअॅलिटी शोमुळे प्रकाशझोतात आलेली एली अवराम सध्या सलमानशी असलेल्या जवळिकीमुळे चर्चेत आहे.

सलमानवर आहे एलीला विश्वास
>बिग बॉस या रिअॅलिटी शोमुळे प्रकाशझोतात आलेली एली अवराम सध्या सलमानशी असलेल्या जवळिकीमुळे चर्चेत आहे. एलीच्या मते सलमान एक नम्र आणि चांगला माणूस आहे. तिचा सलमानवर पूर्ण विश्वास आहे. एली जेव्हा बिग बॉसमध्ये होती तेव्हा सलमान तिला खूप आवडत असे, शोनंतर सलमानने तिला बॉलीवूडमध्ये मदत करण्याची ग्वाही दिली होती.
एलीने सांगितले की,‘सलमान एवढा मोठा स्टार आहे, पण त्याला जीवनाची समज आहे. त्याने मला प्रेरित केले आहे. मी नेहमी त्याच्या संपर्कात असते. त्याने माङयासाठी काहीतरी योजना तयार केली आहे, पण मी आताच त्याबाबत काही सांगू शकत नाही.’ काही दिवसांपूर्वी एलीला एका बॉलीवूड चित्रपटाची ऑफर मिळाली आहे. अब्बास मस्तानच्या आगामी चित्रपटात कपिलसोबत एलीला ही भूमिका ऑफर करण्यात आल्याचे कळते. यापूर्वी एली मनीष पॉलसोबत मिकी वायरस या चित्रपटातही दिसली आहे; पण या चित्रपटाला फारशा चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या नाहीत. आता सलमानची योजना एलीसाठी फायद्याची ठरते का, ते येणा:या काळात समजेलच.