सल्लू बनणार ‘बजरंगी भाईजान’

By Admin | Updated: July 12, 2014 22:56 IST2014-07-12T22:56:12+5:302014-07-12T22:56:12+5:30

‘काबूल एक्स्प्रेस’, ‘न्यूयॉर्क ’ आणि सलमान खानसोबत ‘एक था टायगर’ बनवणारा दिग्दर्शक कबीर खान लवकरच ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट घेऊन येत आहे.

Sallu to become 'Bajrangi Bhaijaan' | सल्लू बनणार ‘बजरंगी भाईजान’

सल्लू बनणार ‘बजरंगी भाईजान’

‘काबूल एक्स्प्रेस’, ‘न्यूयॉर्क ’ आणि सलमान खानसोबत ‘एक था टायगर’ बनवणारा दिग्दर्शक  कबीर खान लवकरच ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटात सलमान खान आणि करिना कपूर मुख्य भूमिकेत असतील. चित्रपटाची निर्मिती सलमान खान वेंटर्स या बॅनरखाली केली जाणार आहे. या चित्रपटाबाबत कबीर सांगतो की, चित्रपट वर्तमान परिस्थितीवर आधारित असून त्यात एका तरुणाची कथा दाखवण्यात येईल. चित्रपटाचे शूटिंग नोव्हेंबरमध्ये सुरू होईल. देशातील अनेक शहरांमध्ये चित्रपट शूट केला जाईल. विशेष म्हणजे पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटाबाबत कबीर खानने टि¦टरवर माहिती दिली आहे. सलमान आणि करिना यांची जोडी 2क्12 मध्ये रिलीज झालेल्या बॉडीगार्ड या चित्रपटात दिसली होती, तसेच मागील वर्षी रिलीज झालेल्या दबंग 2 मध्ये एका आयटम साँगमध्ये ही जोडी दिसली होती.

 

Web Title: Sallu to become 'Bajrangi Bhaijaan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.