'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 15:38 IST2025-11-10T15:38:14+5:302025-11-10T15:38:50+5:30
Aneet Padda : लव्ह स्टोरीवर आधारीत 'सैयारा' सिनेमात झळकलेली अभिनेत्री अनीत पड्डा तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. पण ती या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करण्यापूर्वी कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार आहे.

'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
लव्ह स्टोरीवर आधारीत 'सैयारा' सिनेमात झळकलेली अभिनेत्री अनीत पड्डा तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. पण ती या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करण्यापूर्वी कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार आहे. ती यशराज फिल्म्सनंतर मॅडॉक फिल्म्सच्या आगामी सिनेमात झळकणार आहे. हा एक हॉरर कॉमेडी सिनेमा आहे.
'सैयारा' सिनेमाच्या यशानंतर अभिनेता अहान पांडे आणि अभिनेत्री अनीत पड्डा रातोरात स्टार झाले आहेत. या चित्रपटानंतर त्यांच्याकडे सिनेमांच्या ऑफर्स लाइन लागली आहे. अहान आगामी चित्रपटात दिग्दर्शक अली अब्बास जफरसोबत काम करणार आहे. हा चित्रपट अॅक्शन आणि रोमांसने परिपूर्ण आहे. तर अनीत पड्डा हॉरर कॉमेडी सिनेमात झळकणार आहे.
अनीत पड्डाच्या नवीन सिनेमाची कथा
अनीत लवकरच आगामी हॉरर कॉमेडी चित्रपट 'शक्ति शालिनी'मध्ये दिसणार आहे. ज्याची कथा एका रहस्यमय देवीवर आधारीत आहे, जी वाईट शक्तींपासून लोकांचे संरक्षण करते. या चित्रपटात अनीत पड्डा मुख्य भूमिकेत आहे आणि हा मॅडॉक हॉरर कॉमेडी युनिव्हर्सचा एक भाग आहे.
डिसेंबर-जानेवारीत अनीतची आहे शेवटची परीक्षा
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनीत डिसेंबर-जानेवारीमध्ये तिच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार आहे आणि त्यानंतर लगेचच ती तिच्या आगामी चित्रपटाचे दिनेश विजान यांच्या 'शक्ती शालिनी'चे शूटिंग सुरू करणार आहे, ज्यात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सूत्रांनी पुढे सांगितले की, अनीत सध्या तिच्या अंतिम वर्षाच्या अभ्यासात व्यस्त आहे. ती राज्यशास्त्रात बी.ए. करत आहे आणि काम व अभ्यास यांचा मेळ साधण्यात गुंतलेली आहे. तिचे वेळापत्रक अशा प्रकारे मॅनेज केले जात आहे की, ती अभ्यासाला पूर्ण वेळ देऊ शकेल आणि इथे आगामी प्रोजेक्टची कामेदेखील अडकून राहणार नाहीत.
अनीतने कियाराला केलं रिप्लेस
'सैयारा'ने अनीत पड्डाने वायआरएफची नायिका म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. अनीतच्या प्रभावशाली अभिनयामुळे दिनेश विजान यांनी त्यांच्या ब्लॉकबस्टर मॅडॉक हॉरर कॉमेडी युनिव्हर्सच्या पुढील चित्रपट 'शक्ती शालिनी'साठी तिची निवड केली. 'शक्ती शालिनी'च्या रिलीजबद्दल बोलायचं झाल्यास, हा चित्रपट पुढील वर्षी २४ डिसेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होईल. विशेष म्हणजे, या चित्रपटात अनीत पड्डाने कियारा अडवाणीची जागा घेतली आहे.