सैराटमध्ये.... ‘आताच बया का बावरलं’चा जलवा
By Admin | Updated: February 26, 2016 03:30 IST2016-02-26T03:30:17+5:302016-02-26T03:30:17+5:30
चित्रपट रीलीज होण्यापूर्वी त्यातील एखादे गाणे हिट झाले की बास, तो चित्रपट मग केवळ त्या गाण्यासाठीच पाहिला जातो. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केली जाणारी प्रोमो साँग्ज

सैराटमध्ये.... ‘आताच बया का बावरलं’चा जलवा
चित्रपट रीलीज होण्यापूर्वी त्यातील एखादे गाणे हिट झाले की बास, तो चित्रपट मग केवळ त्या गाण्यासाठीच पाहिला जातो. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केली जाणारी प्रोमो साँग्ज सध्या भलतीच हिट होताना दिसतात. फँड्रीमधील जीव झाला येडापिसा या गाण्याने सगळ्यांनाच वेड लावले. ते गाणे काही चित्रपटात दिसले नाही; परंतु त्याचा जलवा अजूनही कायम आहे. आता फँड्रीचेच दिग्दर्शक नागराज मंजुळे त्यांच्या आगामी सैराट या सिनेमामध्ये असेच एक भन्नाट गाणे घेऊन येत आहेत. आताच बया का बावरलं असे शब्द असलेले हे गाणे अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केले आहे. गाण्यातील शब्द अन् त्याला असलेला गावरान बाज यामुळे हे गाणे तरुणांना नक्कीच भुरळ पाडेल यात शंका नाही.