सैफची मुलगी सुशांतसोबत "केदारनाथ" मधून करणार पदार्पण
By Admin | Updated: June 5, 2017 14:31 IST2017-06-05T14:17:51+5:302017-06-05T14:31:09+5:30
मागील अनेक महिन्यांपासून छोटे नवाब सैफ अली खानची मुलगी सारा अली खानच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत ब-याच चर्चा रंगल्या होत्या. मात्र या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे

सैफची मुलगी सुशांतसोबत "केदारनाथ" मधून करणार पदार्पण
tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - मागील अनेक महिन्यांपासून छोटे नवाब सैफ अली खानची मुलगी सारा अली खानच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत ब-याच चर्चा रंगल्या होत्या. मात्र या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. सुशांतसिंग राजपूतसोबच ती चित्रपटात पदार्पण करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अभिषेक कपूर यांनी या दोघांना आपल्या आगामी सिनेमासाठी दोघांना साईन केले आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे.
दिग्दर्शक अभिषेक कपूर यांच्या केदारनाथ या सिनेमातून सारा अली खान बॉलिवूडमध्ये पर्दापण करत आहे. हा सिनेमा उत्तर भारतात चित्रीत करण्यात येणार आहे. जास्त तर उत्तराखंडमधील केदारनाथ परिसरात शुटींग होणार आहे. या सिनेमात रोमान्स असणार आहे. या वर्षाच्या अखेरीस या सिनेमाचे चित्रिकरण होणार आहे. एकता कपूर बॅनर कंपनी या सिनेमाची निर्मिती होत आहे.
यापूर्वी सारा अली खानला करण जोहर लाँच करणार असल्याचे वृत्त होते. तर मुंबई मिररच्या वृत्तानुसार बॉलिवूडचा दबंग सलमान खान मेहुणा आयुष शर्मा आणि साराला एकत्र लाँच करणार असल्याचे वृत्त होते.