सैफच्या मुलीनं करण जोहरच्या 'या' सिनेमाला दिला नकार!
By Admin | Updated: October 5, 2016 00:01 IST2016-10-04T23:54:22+5:302016-10-05T00:01:24+5:30
सारा अली खान चित्रपट निर्माता करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द ईयर 2' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये झळकणार होती.

सैफच्या मुलीनं करण जोहरच्या 'या' सिनेमाला दिला नकार!
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - अमृता सिंह आणि सैफ अली खान यांची मुलगी सारा अली खान चित्रपट निर्माता करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द ईयर 2' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये झळकणार होती. मात्र सिनेमातून पदार्पण करण्याआधीच तिनं तो चित्रपट करण्यास नकार दिला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, करण जोहरनं या चित्रपटाचा करार करताना एक अट घातली होती. टॅलेन्ट मॅनेजमेंट एजन्सीमध्ये अॅडमिट व्हावं लागण्याची ती अट होती. ही अट साराची आई अमृता सिंह हिला मान्य नव्हती. त्यामुळे अखेर सारा अली खाननं तो चित्रपट नाकारला आहे.
काही दिवसांपूर्वी मसाबा गुप्तांनी इन्स्ट्राग्रामवर साराचा फोटो शेअर केला होता. त्यामुळे ती मीडियाच्या चर्चेत आली होती. लवकरच ती सिनेमात झळकेल, असं ट्विटही त्यावेळी प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्तांनी केलं होतं. त्यामुळे सारा अली खान लवकरच दुस-या एखाद्या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याचं सांगण्यात येते आहे.