सचिन पिळगावकरांची ५२ वर्षांतील पहिली निगेटिव्ह भूमिका!

By Admin | Updated: October 4, 2015 03:42 IST2015-10-04T03:42:32+5:302015-10-04T03:42:32+5:30

मराठी आणि हिंदी मिळून आतापर्यंत तब्बल ६० हून अधिक चित्रपटांत बालकलाकार म्हणून काम केलेले, त्यानंतर प्रियकराच्या भूमिकेत दिसलेले आणि संकलन, दिग्दर्शन तसेच

Sachin Pilgaonkar's 52 years of first negative role! | सचिन पिळगावकरांची ५२ वर्षांतील पहिली निगेटिव्ह भूमिका!

सचिन पिळगावकरांची ५२ वर्षांतील पहिली निगेटिव्ह भूमिका!

मराठी आणि हिंदी मिळून आतापर्यंत तब्बल ६० हून अधिक चित्रपटांत बालकलाकार म्हणून काम केलेले, त्यानंतर प्रियकराच्या भूमिकेत दिसलेले आणि संकलन, दिग्दर्शन तसेच पार्श्वगायन करून चित्रपटसृष्टीत बस्तान बसवणारे सचिन पिळगावकर आता चक्क निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या ५२ वर्षांच्या कारकिर्दीत अशी संधी त्यांच्या वाट्याला प्रथमच आली आहे.
पं. वसंतराव देशपांडे यांनी ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकात अजरामर करून ठेवलेली खाँसाहेबांची भूमिका सचिन पिळगावकर याच नावाने येणाऱ्या चित्रपटात साकारत आहेत. ते म्हणतात, निगेटिव्ह छटा असणारी भूमिका मला रंगवायचीच होती आणि ती संधी ५२ वर्षांनी मला मिळाली आहे. कलावंत हा नेहमीच उपाशी असतो आणि मी तर ५२ वर्षे उपाशी राहिलो होतो.

Web Title: Sachin Pilgaonkar's 52 years of first negative role!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.