हृतिकसाठी नर्गीस बनली रॅपर
By Admin | Updated: October 1, 2014 01:35 IST2014-10-01T01:35:10+5:302014-10-01T01:35:10+5:30
हृतिकचा ‘बँगबँग’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल दाखवतो, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे; परंतु त्यापूर्वीच त्याचा ‘बँगबँग डेअर’ हा बॉलीवूडच्या तारकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

हृतिकसाठी नर्गीस बनली रॅपर
>हृतिकचा ‘बँगबँग’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल दाखवतो, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे; परंतु त्यापूर्वीच त्याचा ‘बँगबँग डेअर’ हा बॉलीवूडच्या तारकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. शाहरुख, रणवीरसिंग, फरहान अख्तर यांच्यानंतर आता ‘डेव्हिल गर्ल’ नर्गीस फाखरी हिनेदेखील हृतिकचे ‘चॅलेंज’ पूर्ण केले आहे. नर्गीसने यू टय़ुबवर एक व्हिडिओ अपलोड केला असून, त्यात ती रॅपर बनली आहे. आयटम साँगपासून अभिनयार्पयत रसिकांना
भुरळ घालणा:या नर्गीसच्या ‘रॅपर लूक’ला यु टय़ूबवर मोठा प्रतिसाद मिळत आहे. एक मिनिट 49 सेकंदांच्या या व्हिडिओत नर्गीसने दाखवलेली कमाल वाखाणण्याजोगी
आहे.