वरद चव्हाणची ‘धनगरवाडा’मध्ये हटके भूमिका
By Admin | Updated: October 4, 2015 22:05 IST2015-10-04T22:05:24+5:302015-10-04T22:05:24+5:30
मराठी चित्रपट आणि मालिकांमधला सहा फूट उंचीचा ‘अँग्री यंग मॅन’ कोण, असे म्हटले तर लगेच वरद चव्हाणचे नाव येते. ‘मोरूची मावशी’मध्ये ‘टांगटिंग टिंगाक् टांगटिंग टिंगा’वर नृत्य करीत

वरद चव्हाणची ‘धनगरवाडा’मध्ये हटके भूमिका
मराठी चित्रपट आणि मालिकांमधला सहा फूट उंचीचा ‘अँग्री यंग मॅन’ कोण, असे म्हटले तर लगेच वरद चव्हाणचे नाव येते. ‘मोरूची मावशी’मध्ये ‘टांगटिंग टिंगाक् टांगटिंग टिंगा’वर नृत्य करीत लोकांचे निखळ मनोरंजन करणाऱ्या विजय चव्हाण यांचा हा मुलगा. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकीत चित्रपटसृष्टीमध्ये त्याने प्रवेश केला, तरी विनोदी भूमिकांपेक्षा व्हिलन आणि काहीशा नकारात्मक भूमिकांनाच त्याने जास्त पसंती दिली. ‘चंद्रकला,’ ‘आॅन ड्युटी चोवीस तास’, ‘तुझी माझी लव्हस्टोरी’ या चित्रपटांमध्ये त्याच्या अभिनयाचे दर्शन घडले. आता लवकरच ‘धनगरवाडा’ चित्रपटात तो हटके भूमिकेमध्ये दिसणार आहे. धनगर समाजाचे जीवन आणि त्यांना येणाऱ्या अडचणी, असे चित्रपटाचे कथानक आहे. विविध चित्रपट महोत्सवांमध्येही ज्युरींनी या चित्रपटाची दखल घेतली आहे. येत्या दिवाळीमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.