भूमिका कलाकारांना घडवतात: बरुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2017 02:54 IST2017-05-21T02:54:42+5:302017-05-21T02:54:42+5:30

तब्बल पाच वर्षांच्या ब्रेकनंतर अभिनेता बरुण सोबती छोट्या पडद्यावर कमबॅक करतोय. मालिकेच्या माध्यमातून पुन्हा रसिकांच्या भेटीला येत असल्यामुळे तो खूप एक्ससाईटेड आहे

Role forms cast: Baruna | भूमिका कलाकारांना घडवतात: बरुण

भूमिका कलाकारांना घडवतात: बरुण

तब्बल पाच वर्षांच्या ब्रेकनंतर अभिनेता बरुण सोबती छोट्या पडद्यावर कमबॅक करतोय. मालिकेच्या माध्यमातून पुन्हा रसिकांच्या भेटीला येत असल्यामुळे तो खूप एक्ससाईटेड आहे. याचनिमित्ताने त्याच्याशी साधलेला हा संवाद...

तुझी फेव्हरेट को-स्टार सनया इराणीसह तू पुन्हा कधी झळकणार?
- छोट्या पडद्यावर सन्या आणि माझी केमिस्ट्री चांगलीच रंगली होती. रसिकांनाही आमची जोडी खूप भावली.आम्ही खूप चांगले मित्र आहोत. त्यामुळे आपसुकच या मैत्रीची झलक आमच्या कामातही पाहायला मिळते. तिच्यासह काम करण्यासाठी मीही बराच उत्सुक आहे. त्यामुळे नक्कीच एखादी चांगली स्क्रिप्ट मिळाली तर सनयासह नक्कीच काम करायला आवडेल.सध्या डोक्यात ब-याच गोष्टी आहेत, खूप प्लॅनिंग सुरू आहेत. बघू आता सगळं कसं जुळून येतंय?

तू वेबसिरीजमध्ये काम केलं आहेस. आता छोट्या पडद्यावर कमबॅक करतोय. तर वेबसिरीज आणि छोटा पडदा यांत तुला काय फरक जाणवतो?
- दोन्ही मनोरंजनाची माध्यमे आहेत. त्यामुळे दोन्ही माध्यमे वेगळी असली तरी रसिकांचं मनोरंजन करणे हाच एक उद्देश असतो. त्यामुळे मला दोघांमध्ये फारसा काही फरक जाणवत नाही. एक कलाकार म्हणून वेगवेगळ्या भूमिकांतून रसिकांपर्यत पोहचणे हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. सध्या वेबसिरीजचा जमाना असल्यामुळे मला एका वेबसिरीजची आॅफर आली आणि ती ही मी स्वीकारली. वेबसिरीज तरुणाईमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यामुळे यंगस्टर्सपर्यंत पोहोचण्याचा हा एक उत्तम पर्याय वाटतो. वेबसिरीजप्रमाणेच टीव्हीवरही काम करण्याची इच्छा होती. त्यामुळे मला आॅफर करण्यात आलेली भूमिका आवडली आणि होकार दिला़. मला आशा आहे की, रसिक पुन्हा मला भरभरून प्रेम देतील.

भूमिका सगळ्या चांगल्याच असतात, मात्र भूमिका स्वीकारताना तू कोणत्या गोष्टीचा विचार करतो ?
- सिनेमाच्या कथेनुसार मी खरंच त्या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकतो का? या गोष्टीचा मी सतत विचार करतो. जेव्हा मला मनापासून वाटते की, ही भूमिका मी चांगल्याप्रकारे करू शकतो. रसिकांशी कनेक्ट होऊ शकतो अशाच भूमिका मी आजपर्यंत स्वीकारल्या आहेत. जिथे मला वाटते की, एखाद्या भूमिकेसाठी मी फिट बसत नाही,मी ती भूमिका साकारु शकत नाही असं ज्यावेळी मला वाटतं तेव्हा त्या भूमिका मी स्वीकारत नाही. अव्दैय सिंग रायजादा या भूमिकेवर आधीही रसिकांनी भरभरून प्रेम केले.त्यामुळे पुन्हा एकदा ही भूमिका करण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीपासून हाच एक विचार करून मी भूमिका स्वीकारल्या आहेत आणि यापुढेही माझी भूमिका स्वीकारण्याचे हेच धोरण असेल.

छोट्या पडद्यावर परतण्यासाठी इतका वेळा का लागला?
- मालिका संपल्यानंतरही मला बऱ्याच आॅफर आल्या होत्या. मात्र, मला जशा हव्या तशा त्या भूमिका नव्हत्या. त्यामुळे मी त्या स्वीकारल्या नाहीत. मध्यंतरीच्या काळात सिनेमाच्या आॅफर आल्या. काहीतरी वेगळं म्हणून मी त्या मी स्वीकारल्या. ‘मि.राईट’ या सिनेमातून मी बॉलिवूडमध्येही पदार्पण केले. ‘सतरा को शादी है’ आणि ‘२२ यार्ड’ या दोन सिनेमातही मी काम केले आहे. लवकरच हे दोन्ही सिनेमे रसिकांच्या भेटीला येतील.

Web Title: Role forms cast: Baruna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.